तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परीषद उर्दू प्रशालेच्या माध्यमिक विभागला तब्बल 19 वर्षानी दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 1 ली ते 7 वी पर्यंत प्रशाला होती.सप्टेंबर 2000 पासून जि.प.उर्दू प्रशालेला कायम विनाअनुदानीत तत्वावर.8वी ते 10 वी पर्यंत मान्यता मिळाली.तरीही प्राथमिक विभागाचे शिक्षकच माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्याना शिकवत होते. 2012मध्ये शासनाने कायम शब्द काढून घेतल्याने सदरील प्रशाला विना अनुदानीत तत्वावर चालुच होती.माध्यमीक विभागाच्या विद्यार्थ्यांना प्राथमिक विभागाचे शिक्षकच अध्यापन करत होते.ही बाब जि.प.उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक तय्यबअली शहा यानी सविस्तरपणे जि.प.च्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांना सांगितल्यानंतर अर्चनाताई पाटील यानी शिक्षण विभागाला तात्काळ दखल घेण्याचे आदेश दिल्याने याबाबीची तात्काळ दखल घेऊन तेरच्या जि.प.उर्दू प्रशालेच्या माध्यमिक विभागाला दोन शिक्षकांची नेमणूक केली आहे.त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.नविन दोन शिक्षकांचा प्रशालेत तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष जुनेद मोमीन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.