कळंब,/प्रतिनिधी - कळंब तालुक्याचा वाढलेला शैक्षणिक दर्जा हा अभिमानास्पद असुन कळंब तालुक्यातील शिक्षक वर्ग भविष्यकाळात शिक्षणात गत वैभव प्राप्त करून देईल असे प्रतिपादन लातूर येथील सरस्वती महाविद्यालयाचे अधिव्याख्याता प्रा डॉ सुदामराव पवार यांनी नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा व ज्युनियर आय ए एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कळंब येथील विद्याभवन शाळेत आयोजित सत्कार समारंभात केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रजवलन व सरस्वती पुजन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चैनशिंग गुशिंगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे प्रदेशउपाधयक्ष तथा पत्रकार परमेश्वर पालकर, लतामंगेशकर शाळेचे सहशिक्षक गजानन पाटील, उपस्थित होते तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शिंदे, संभाजी गिडडे, संस्थेचे संचालक मंगेश परीहार व भागवत पवार उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले की कळंब मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यार्थी घडत आहेत मधल्या काळात घसरलेला शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. चांगली वातावरण निर्मिती कळंब येथे होत आहे. कठोर परिश्रम केल्याशिवाय यश मिळत नाही. विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची सवय अंगी बाणवून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षक संघटनेचे परमेश्वर पालकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आई वडील हे आपण जिवनात यशस्वी व्हावे यासाठीच रागवत असतात. त्या रागावणयामागे आपल्या यशाचे रहस्य दडलेले असते. आई वडीलांचे लहान वयातील संस्कार हे दीर्घकाळ परीणामकारक असतात. त्यामुळे सध्या संस्कृती आणि संस्कार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
गजानन पाटील यांनी आपल्या मनोगतात असे सांगितले की आजच्या महीला या विविध क्षेत्रात कार्य करत असल्याने महीलाना वाटते की आपल्या सोबत पुरूषांनी सुध्दा मुलांचे पालण पोषण करावे. त्यामुळे महीलांचे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. महीलांनीच मुलांना प्राधान्य द्यावे तरच मुले घडू शकतात. तसेच पालकांनी मुलांकडून अवाजवी अपेक्षा करायचे सोडून द्यावे. प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याच्या आवडीनुसार करीयर करू द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी पालकांना केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश परीहार यांनी केले तर सूत्रसंचालन धनाजी भालेराव यांनी केले तर आभार भागवत पवार यांनी मानले.
 
Top