उस्मानाबाद/प्रतिनिधी- कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही  पावसाचे  बरेच पाणी वाहून जाते,आता या पाण्याला योग्य दिशा देवून हे पाणी मराठवाडयाला उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. महाराष्ट्रातील धरणांना जोडणाऱ्या एका ग्रीड सिस्टीमला मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून याद्वारे तापी खोऱ्यातून व पश्चिम महाराष्ट्रातून एक पाईपलाईन या ग्रीड सिस्टीमला  जोडली जाणार आहे, याशिवाय कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचेही काम सुरु करण्यात आले आहे, यातूनच मराठवाडयासाठी 35 टीएमसी पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे,असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज येथे केले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपस्थित असलेल्या सन्माननीय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी,  पत्रकार बांधव आणि नागरिक बंधू-भगिनींना सर्वप्रथम पालकमंत्री प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत यांनी  भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक राजा राम सामी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, अप्पर जिल्हाधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, जिल्हा शासकीय अभियोक्ता ?ङ शरद जाधवर, अधीक्षक अभियंता श्री.कुलकर्णी, कार्यकारी अभियंता अनिल सगर, उमेश झगडे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, जिल्हा पुरवठा अधिकारी  डॉ. चारुशिला देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रताप काळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी आंधळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुधाकर आडे,विभागीय वन अधिकारी श्री. बेडके, उप वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.पवार,तहसिलदार अभय म्हस्के,राजकुमार माने,जिल्हा क्रीडा अधिकारी  भाग्यश्री बिले, सहायक क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राचे श्री. रुकमे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, शिक्षणाधिकारी श्री. सुसर, श्रीमती भोसले ,जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे, विविध विभागांचे विभाग प्रमुख, पत्रकार, विद्यार्थी  व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत यांनी  सर्वप्रथम महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आलेल्या महापूरामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांप्रती सहानुभूती व्यक्त केली आणि त्या उध्वस्त झालेल्या सर्व कुटुंबांना आश्वस्त केले की, हे शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. त्या सर्व कुटुंबांना हे शासन सर्व प्रकारची मदत करीत आहे व  यापुढेही करीत राहील.
प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत यांनी  आपल्या भाषणात भारत सरकारच्या नेहरु युवा केंद्र, उस्मानाबाद   कार्यालयाने 01 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला. यामध्ये तब्बल 200 गावांमध्ये स्वच्छता,ग्रामस्वच्छता, वृक्षलागवड, रॅली, घर ते घर स्वच्छता जनजागृती, स्वच्छता संदेश पोस्टर इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. त्याबद्दल मी पालकमंत्री या नात्याने नेहरू युवा केंद्राचे हार्दिक अभिनंदन केले व भविष्यातही त्यांनी असेच उत्तम कार्य करावे, यासाठी शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले, केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अभियान (नागरी) च्या धर्तीवर राज्यामध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी राबविण्यात येत असून, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतीकरिता वैयक्तिक शौचालयाचे उदिदष्टय 18 हजार 730 असून त्यापैकी  15 हजार 357 उदिदष्टय साध्य झाले आहे.  तसेच सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाचे उदिदष्टय 100 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. महिला व  बालविकास विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद या विभागाने सन 2018-19 या वर्षात पोषण अभियान योजनेत उल्लेखनीय कार्य केल्यामुळे महाराष्ट्र राज्यातून उस्मानाबाद जिल्हयाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेली आहे, ही उस्मानाबाद जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे.
महिला बचतगटाच्या नाविन्यपूर्ण उद्योग संकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी "हिरकणी- नवउद्योजक महाराष्ट्राची"ही योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यात सुरुवात झाली आहे.या अंतर्गत प्रत्येक तालुकानिहाय 10 अशा 80 बचतगटांची निवड करण्यात आली असून जिल्हास्तरावर या 80 बचतगटांपैकी दहा उत्कृष्ट बचतगट निवडण्यात आले आहेत. तालुकास्तरीय बचतगटांना 50 हजार रुपये तर जिल्हास्तरीय बचतगटांना दोन लाख रुपये त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.आज या बचतगटांना प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात येत आहे.
 बळीराजा चेतना अभियानांतर्गत शुभमंगल सामूहिक /नोंदणीकृत विवाह सोहळयासाठी प्रती जोडपे 15 हजार रूपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यासाठी 22 लक्ष 20 हजार रुपये अनुदान प्राप्त झाले असून या अनुदानातून  आत्महत्याग्रस्त तसेच त्रस्त कुटुंबातील एकूण 148 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असे सांगून प्रा.डॉ.श्री. तानाजी सावंत पुढे
म्हणाले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद अंतर्गत प्रशिक्षण, अभ्यासदौरा, कार्यशाळा, क्षमता बांधणीच्या  माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे अथक प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषद व जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पदवीधर मुलींसाठी चालविल्या जाणाऱ्या उमेद स्पर्धा परीक्षा केंद्राच्या  माध्यमातून  आतापर्यंत अनेक मुलींनी लाभ घेतला  त्यापैकी  काही मुली शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन स्वावलंबी बनल्या आहेत.
 सार्वजनिक आरोग्य विभागातील कामाबाबत बोलताना ते म्हणाले, 2018-19 या वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण भागातील 17 लाख 6 हजार 103 रूग्णांनी बाहायरूग्ण सेवा व 1 लाख 38 हजार 704 रूग्णांनी आंतर रूग्णसेवेचा लाभ घेतला आहे. त्याचबरोबर 28 हजार 600 गरोदर माता व 26 हजार 755 बालकांनी लसीकरण व आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 40 हजार 746 रुग्णांवर 77 कोटी 12 लाख 98 हजार 415 इतक्या रुपये खर्चाच्या  विविध उपचार-शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच आयुष्यमान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसह राज्यात राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत आतापर्यंत एकूण 7 हजार 338 रुग्णांवर विविध उपचार-शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेमुळे उस्मानाबाद जिल्हयाचा अर्भक मृत्यूदर हा दर एक हजार जिवंत जन्मामागे 16 तर माता मृत्यू दर हा 50 पेक्षा कमी आला आहे. ही बाब अत्यंत महत्वाची व आशादायक असून निश्चित अभिनंदनीय आहे.
 जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामाबदल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले की, अभिसरण योजनांमधून सन 2015- 16 ते सन 2018-19 या चार वर्षामध्ये एकूण 664 गावांची निवड करण्यात आलेली होती. या निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये विविध यंत्रणाची मिळून मृद व जलसंधारणाची एकूण 44 हजार 747 इतकी कामे प्रस्तावित करण्यात आलेली होती. प्रस्तावित करण्यात आलेल्या गाव कृती आराखडयानुसार 45 हजार 286 इतकी मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात आलेली असून या पूर्ण करण्यात आलेल्या कामांवर 335कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आलेला आहे. या पूर्ण करण्यात आलेल्या कामांमुळे 1 लाख 63 हजार 596 टीसीएम इतका पाणीसाठा निर्माण होण्यास मदत झालेली आहे. तसेच या पूर्ण करण्यात आलेल्या कामामुळे 1 लाख 19 हजार 797 हेक्टर इतकी संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भारतीय जैन संघटना व जलसंधारण विभाग यांच्या माध्यमातून  सामंजस्य करारानुसार "सुजलाम सुफलाम"अंतर्गत झालेल्या  कामांचे कौतुक करुन त्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 3 हजार 700 शेततळयांचे उदिष्टांपैकी  3 हजार 570 शेततळयांची कामे पूर्ण झाली आहेत, त्यासाठी 1 हजार 515रुपये लक्ष इतका निधी खर्च झालेला आहे, असे सांगितले.
सन 2017-18 या वर्षात गाळमुक्?त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून एकूण 70 मध्यम व लघु प्रकल्प तसेच पाझर तलावांमधून 83 लाख 99 हजार 456 घनमीटर. इतका गाळ काढण्यात आला असून त्यासाठी 19 कोटी 36 लाख 42 हजार 176 रुपये
खर्च असून त्यातून धरणाची 8 हजार 399 टीसीएम एवढी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयामध्ये कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम(कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प लिंक-5 सह) प्रगतीपथावर असून या प्रकल्पास  राज्यपाल महोदयांच्या निधी सूत्राबाहेर निधी प्राप्त होत असून सन 2017-18 मध्ये रु.237 कोटी व
सन 2018-19 मध्ये रु.523 कोटी असे एकूण रु. 760 कोटी निधी प्राप्त असून सन 2019-20 साठी रु.500 कोटी निधीची तरतुद मंजूर असून  प्रकल्पाचे काम  प्रगतीपथावर आहे.
ते पुढे म्हणाले, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत मागील पाच वर्षामध्ये पूर्ण झालेल्या साठवण तलावाद्वारे 11 दलघमी पाणीसाठा व 2 हजार 298 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती झालेली आहे. उस्मानाबाद जिल्हयात नरेगा अंतर्गत एकूण 6 हजार 382 सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली असून त्?यासाठी  6 हजार 879 लक्ष रूपये खर्च करण्?यात आला आहे.याशिवाय  परांडा, भूम, वाशी या तीन तालुक्यांसाठी 135 बंधाऱ्यांना शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे.
 पालकमंत्री महोदयांनी विकासरत्न प्रा.डॉ. तानाजीराव सावंत प्रतिष्ठानमार्फत आपल्या जिल्हयात 4 मे 2016 रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती अभियान सुरू करण्यात आले, याचा विशेष उल्लेख करुन परांडा, भूम, वाशी तालुक्यात लोकसहभागातून नदी खोलीकरण,रुंदीकरण, सरळीकरण या कामांवर  65 कोटी रुपये खर्च करून तब्बल 502 कि.मी. चे काम झाले.याच कामांचा आदर्श घेऊन यवतमाळ जिल्हयातही 50 कि.मी. चे काम करण्यात आले.त्याचबरोबर पाणीटंचाईच्या दिवसांमध्ये परांडा, भूम, वाशी तालुक्यात 100 टँकरने तर यवतमाळ शहरास 73 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या सर्व कामात रामचंद्र घोगरे सर,डॉ.शहाजी मिस्कीन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येणाऱ्या काळातही या जिल्हयाच्या विकासासाठी मी पालकमंत्री या नात्याने अहोरात्र कष्ट करून जिल्हयाची मागासलेला जिल्हा,दुष्काळग्रस्त जिल्हा ही ओळख बदलून विकसित जिल्हा म्हणून आपल्या जिल्हयाला ओळख मिळवून देईन, अशी ग्वाही दिली  आणि या प्रयत्नास  या जिल्हयातील  सहकारी लोकप्रतिनिधी, अधिकारी निश्चितच साथ देतील, अशी अपेक्षाही बाळगतो, असे म्हणाले.
पाणी टंचाई प्रश्नाबाबत शासनाने केलेल्या उपाययोजनांबाबत बोलताना पालकमंत्री श्री. सावंत म्हणाले की, पाणी टंचाई निवारणार्थ करण्?यात येणा-या उपाययोजनांसाठी सन 2014 ते 2019 या कालावधीमध्ये जिल्हयाला 7 हजार 811 लक्ष रुपये इतका निधी प्राप्?त झाला. जिल्?ह्रयातील दुष्?काळ निवारणाच्?या उपाययोजना आणि मदत वितरणाकरिता  नोव्?हेंबर 2014 ते 15 जुलै, 2019 या कालावधीमध्?ये उस्?मानाबाद जिल्?ह्यातील नगर विकास विभागातील नगरपरिषद, उस्मानाबाद करिता सन 2014-15 अंतर्गत उजनी उद्भव योजनेकरिता  1 हजार 516 लक्ष रुपये निधी वितरित करण्?यात आला आहे. सन 2015-16  व 2016-17 अंतर्गत जिल्?ह्यातील नगरपरिषदांना एकूण  355 लक्ष रुपये निधी पिण्?याच्या पाण्?याच्या टंचाई निवारणार्थ वितरित करण्?यात आलेला आहे.
जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाबाबत बोलताना विदर्भ व मराठवाडा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील 493 गावांची निवड करून या गावातील पशुपालकांसाठी प्रशिक्षण, वैरणीचे ठोंबे वाटप, कडबाकुट्टी,मुरघास तसेच त्यांच्याकडील जनावरांना पशुखाद्य व पशुखाद्याचा पुरवठा करणे, ही योजना राबविण्यात येत आहे. या वर्षात  उस्मानाबाद जिल्हयात 106 चारा छावण्?यांना मंजुरी देण्?यात आली असून त्?यापैकी 90 चारा छावण्?या सुरु होत्?या. चारा छावणी प्रयोजनासाठी मे 2019 या महिनाअखेर 2 हजार 399 लक्ष रुपये इतका निधी प्राप्?त झाला आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सन 2014 ते सन 2019 या कालावधीमध्ये पशुवैदकीय दवाखान्यामार्फत केलेल्या 5 लाख 25 हजार 652 इतक्या कृत्रिम रेतनापासून 1 लाख 40 हजार 402 इतक्या  पशुधनाची निर्मिती झाली आहे.तसेच जिल्हयातील पशुधनाचे सांसर्गिक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सन 2014 ते 2019 मध्ये एकूण 75 लाख 59 हजार 724 इतके रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत सर्वच चारा छावण्या सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे प्रशासनाने त्याची अंमलबजाणी करावी, असे निर्देश श्री. सावंत यांनी  यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत उस्मानाबाद जिल्हयात 64 हजार 3 शेतकऱ्यांना एकूण 35 हजार 473 लाख रक्कमेची कर्जमाफी झाली आहे. एकरकमी परतफेड योजनेंतर्गत 5 हजार 915 शेतकऱ्यांना  7 हजार 138 लक्ष  रुपये एवढया रक्कमेचा लाभ मिळालेला आहे. 50 हजार 993 शेतकऱ्यांना 7 हजार 233 लक्ष रक्कमेचा प्रोत्साहनपर लाभ मिळालेला आहे. अशा प्रकारे उस्मानाबाद जिल्हयातील एकूण 1 लाख 20 हजार 911 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत 49 हजार 822 लक्ष रुपये एवढया रक्कमेचा लाभ मिळालेला आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. सावंत यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत उस्?मानाबाद जिल्?हयामधील पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंब संख्या  2 लाख 48 हजार 707 पैकी पहिला हप्?ता 2000 प्रमाणे एकूण 70 हजार 646 शेतकरी कुटुंबाना व दुसरा हप्?ता 2000 प्रमाणे एकूण 59 हजार 763 शेतकरी कुटुंबांना लाभ देण्?यात आला आहे, अशी माहिती दिली.
पालकमंत्री श्री. सावंत यांनी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सन 2018-19 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत असून 3 कोटी 85 लाख प्राप्त अनुदानातून 131 लाभार्थी शेतक-यांची नवीन विहीर पॅकेज अंतर्गत निवड करून त्यांना लाभ देण्यात येत आहे,असे सांगताना प्रधानमंत्री आवास
योजना नागरी अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 नगरपरिषदा व 2 नगरपंचायती यांच्याकरिता सन 2020 पर्यंत 5 हजार 377 घरकुलांच्या उदिदष्टयांपैकी 2 हजार 192 घरकुलांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र वितरित करण्?यात आले आहे. तर 10 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत करण्यात आलेल्?या सर्व्हेक्षणानुसार या जिल्हयातील एकूण 6 हजार 728 लाभार्थी घरकुलांच्या लाभासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत 3 हजार 554 लाभार्थीना मंजूरी देण्?यात आलेली असून त्यापैकी पूर्ण घरकुल संख्या 2 हजार 593 इतकी आहे.रमाई आवास योजनेंतर्गत या जिल्हयास सन 2016-17 ते 2019-20  या कालावधीत 5 हजार 477 लाभार्थीना मंजूरी देण्यात आलेली असून त्यापैकी पूर्ण घरकुल संख्या ही 2 हजार 593 इतकी आहे. शबरी आवास योजनेंतर्गत या जिल्हयास सन 2016-17 ते 2019-20  या कालावधीत 90 लाभार्थीना मंजूरी देण्यात आलेली असून त्?यापैकी पूर्ण
घरकुल संख्या ही 60 इतकी आहे.पारधी आवास योजनेंतर्गत या जिल्हयास सन 2016-17 ते 2019-20  या कालावधीत 247 लाभार्थीना मंजूरी देण्यात आलेली असून त्यापैकी पूर्ण घरकुल संख्या ही 98 इतकी आहे. सौभाग्य योजनेंतर्गत 11 हजार 150 तसेच ग्रामज्योती योजनेंतर्गत 40 नवीन वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. ग्राम स्वराज अभियानाच्या उज्वला योजनेंतर्गत जिल्?हयातील 488 गावांची निवड करण्यात आली होती. या अभियानामध्?ये एकूण 25 हजार 191 लाभार्थीना गॅस जोडणी देण्यात आली आहे,असेही सांगितले.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेबाबत बोलताना पालकमंत्री श्री. सावंत  उस्मानाबाद जिल्?हयात विविध बँकांमार्फत नोव्?हेंबर 2014 ते 15 जुलै 2019 या कालावधीत 2 लाख 25 हजार 288 लाभार्थ्यांना तब्बल 1 लाख 10 हजार 801 लक्ष रूपयांचे कर्ज वाटप करण्?यात आले असून प्रमोद महाजन कौशल्?य विकास अभियानांतर्गत जिल्हयात 91 प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून 2 हजार 561 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून आणखी 220 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्?यातील 783 विद्यार्थ्यांकडून रोजगार व स्वयंरोजगारास सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत गेल्या 5 वर्षात व्?यवसायासाठी 221 सुशिक्षित बेरोजगारांना  एकूण 26 कोटी रुपये कर्ज मंजूर तर 6 कोटी रुपये अनुदान स्वरूपात वाटप करण्यात आले आहेत.शासनाच्या क्लस्टर योजनेंतर्गत जिल्हयात एकूण 21 कोटी रुपयांच्या 4 प्रकल्पांना, 16 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्यात आले असून याव्दारे 534 छोटया उदयोगांना लाभ झाला  आहे,असे म्हणाले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात सन 2015-16 ते 2019-20 या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये 185 कामांच्या माध्यमातून रूपये 556कोटी रुपये इतक्या अंदाजित किंमतीचे 930 कि.मी. लांबीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्टय ठेवण्यात आले आहे.यापैकी सुमारे 412 कि.मी. लांबीचे रस्ते बांधणीचे काम पूर्ण झाले असून त्यावर सुमारे 192कोटी  रुपये इतका खर्च झाला आहे,अशी माहिती देवून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत माहे जून अखेर पर्यंत एकूण 12 हजार 335 स्वयंसहायता समूहांची स्थापना, 7 हजार 639 स्वयंसहायता समूहांना रक्कम 1 हजार 145 लक्ष रुपये इतका फिरता निधी वाटप, 2 हजार 311 स्वयंसहायता समूहांना 2 हजार 251 लक्ष रुपये इतका समुदाय गुंतवणूक निधी वाटप तर 535 ग्रामसंघांची  व 38 प्रभाग संघांची  स्थापना करण्यात आली आहे,असे सांगून ते पुढे म्हणाले, उस्मानाबाद जिल्हयातील 1 हजार 780 शाळांपैकी 1 हजार 256 शाळा प्रगत, 70 टक्के डिजिटल शाळा लोकसहभाग, 14 वा वित्त आयोग याव्दारे आणि 30 टक्के शाळा मोबाईल  डिजिटल झालेल्या असून 95 टक्के  शिक्षक तंत्र स्नेही  शिक्षक आहेत.
ज्या सामाजिक संस्थांनी,शाळांनी, महाविद्यालयांनी लोकराज्य मासिकाच्या जनजागृतीकरिता झोकून देऊन काम केले आहे, अशा लोकराज्यशाळा विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा,तालुका- कळंब,लोकराज्य महाविद्यालय  महाराष्ट्र संत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तेर, तालुका उस्मानाबाद, लोकराज्य कृषीमहाविद्यालय शासकीय कृषी महाविद्यालय, गडपाटी, तालुका- उस्मानाबाद, लोकराज्य सामाजिक संस्था एकता फाउंडेशन, उस्मानाबाद, (अभिलाष लोमटे ,प्रेरणा महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था, (पद्मिनी निंबाळकर), यश मेडिकल फाउंडेशन व व्यसनमुक्ती केंद्र, येरमाळा, (डॉ. संदीप तांबारे),लोकराज्यग्राम- डकवाडी, आणि लोकराज्यदूत म्हणून डॉ. संदीप तांबारे, डॉ.किरण शंकरराव थोरात, आदित्य गोरे, राजेंद्र  धावारे या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन याप्रसंगी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते व   जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आणि पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात  आला.
याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता प्राप्त जिल्हा परिषद केंद्रीय प्रा.शाळा पारगाव, स्नेहा श्याम कवडे, जिल्हा परिषद कन्या शाळा, सई रविंद्र जगताप, प्रा.शाळा तडवळे क, ग्रीनलॉड प्रायमरी स्कूल, सर्वेश संभाजी गायकवाड उस्मानाबाद, तुळजामाता  इंग्लिश मेडीयम  स्कूल तुळजापूर,प्रज्वल किरण पवार, ग्रीडलॅंड पब्लिक स्कूल, शेकापूर, परिक्षित किरण पवार, ग्रीडलॅड पब्लिक स्कूल, शेकापूर, तन्वी कुंडलीक पवार, अभिनव इंग्लिश स्कूल, उस्मानाबाद, आविष्कार राजाभाऊ पडवळ, छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, उस्मानाबाद सार्थक विवेक सरवदे या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच "हिरकणी-उद्योजक नवमहाराष्ट्राची" अंतर्गत निवड झालेल्या आम्रपाली महिला स्वयंसहायता गट तावशीगड ,ता.लोहारा, मदिना महिला स्वयंसहायता गट पळसप,ता. उस्मानाबाद ,सन्मती स्वयंसहायता गट उस्मानाबाद ता. उस्मानाबाद,सौदामिनी स्वयंसहायता गट कंडारी ता. परंडा,सदगुरु स्वयंसहायता गट  देवसिंगा तूळ ता. तुळजापूर, लक्ष्मी स्वयंसहायता गट कोळसूर क ता. उमरगा, लक्ष्मी स्वयंसहायता गट नाईकनगर मुरुम ता. उमरगा, सप्तशृंगी स्वयंसहायता गट डोंजा, ता. परंडा.बिस्मिला स्वयंसहायता गट, नागूर ता. लोहारा, संतोषी स्वयंसहायता गट कडकनाथवाडी, ता. वाशी. यांचाही प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी प्रांगणात ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी  सावंत यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी  हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. तसेच पुरस्कार वितरणानंतर पालकमंत्री श्री.सावंत यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी,पत्रकार बांधव आणि नागरिक बंधू-भगिनींची भेट घेवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
 
Top