उस्मानाबाद/प्रतिनिधी- शहर पोलीस स्टेशनच्या वतीने बकरी ईद निमित्त पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक हजर होते या बैठकीत पोलिस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना आव्हान करण्यात आले होते की श्रावण महिना चालू असल्याने मुस्लिम समाजाची बकरी ईद सोमवारी आली आहे याच अनुषंगाने हिंदू समाजात श्रावण सोमवारला खूप महत्त्व आहे याचा अनुषंगाने मुस्लिम समाजात ही बकरी ईदला खूप महत्त्व आहे
      हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक म्हणून पोलिस प्रशासनाच्या वतीने एक चांगला प्रयत्न म्हणून सोमवारी मुस्लिम समाजाच्या वतीने सोमवारी बकरी ईद साजरी करावी व सोमवारी बकरीची बलिदान न देता ते मंगळवारी व बुधवारी देण्यात यावे त्याच अनुषंगाने मुस्लिम समाजाच्या वतीने या शांतता कमिटीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की सोमवारी बकरी ईद निमित्त कुठल्याही प्रकारची बलीदान न देता बकरी ईद साजरी करण्यात येईल तसेच कोल्हापूर सांगली सातारा याठिकाणी सध्या पूरग्रस्त स्थिती आहे बकरी ईद निमित्त मुस्लिम समाजाच्या वतीने याच दिवशी पूरग्रस्तांना छोटीशी मदत म्हणून एक दिवशी नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांच्या वतीने निधी गोळा केला जाईल तो निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करून पूरग्रस्तांना करिता पाठवला जाईल, व बकरीद चे बलिदान मंगळवारी व बुधवारी करण्यात येईल असे आश्वासन मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासनास देण्यात आले या बैठकीस शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, api चव्हाण सर,पोलीस उपनिरीक्षक जाधव सर,पोलीस उपनिरीक्षक शेख सर, पोलीस नाईक बिरनवार, पोलीस कॉन्स्टेबल टहाकळे, तसेच मुस्लिम समाजातील उस्मान कुरेशी पठाण मैनोदीन खलिफा कुरेशी इस्माईल कुरेशी इस्माईल शेख अब्बास कुरेशी सिद्धिकी कुरेशी मंनान कुरेशी संजय वाघमारे आदींसह मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
Top