तुळजापूर/प्रतिनिधी-

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर नगरीतील विविध भागातील चौकांचे नामकरण करण्यात आले. अनेक वर्षापासून विशेष अशा नावाची ओळख नसलेल्या चौकांना आता महापुरूषांच्या नावाने ओळखले जाणार आहे. या चौकांच्या नामफलकांचे अनावरण महंतांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरूवारी करण्यात आले. 
शहरातील जुने बसस्थानकाजवळील चौक आता राजमाता जिजाऊ चौक या नावाने ओळखला जाणार आहे. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चौकाला महाराणी ताराराणी, नळदुर्ग रोड मार्गावर राजे शहाजी चौक तर उस्मानाबाद बायपासवरील चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण करण्यात आले. नामफलकाच्या अनावरण सोहळ्यास महंत मावजीनाथ, महंअ व्यंकटअरण्य महाराज, नगराध्यक्ष बापूसाहेब कणे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुधीर कदमख, छावा संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जीवनराजे इंगळे, मनसेचे अमरराजे परमेश्वर, 
जिजामाता प्रतिष्ठानचे मधुकर शेळके तसेच महेश चोपदार, दत्ता सोमाजी, अर्जुन साळुंके, नितीन जट्टे, विकी वाघमारे, सागर इंगळे, दिनेश रसाळ, मयूर कदम, राजेश्वर कदम, महेश गवळी, आण्णासाहेब क्षीरसागर, प्रशांत अपराध, नितीन पवार, किशोर पवार, उमेश दळवी, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, महादेव कुतवळ, रोहित चव्हाण, चेतन बंडगर, राजेश कोळगे, अतुल काळे, शेखर साळुंके, राहुल काळे आदीसह विविध पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
 
Top