उस्मानाबाद /प्रतिनिधी-
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उस्मानाबाद शाखेच्या वतीने आयोजित उस्मानाबाद महोत्सवांतर्गत लोककला महोत्सवाचे व जिल्हास्तरीय लोककलावंतांच्या मेळाव्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते रविवारी (दि.18) शानदार उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, डॉ. गणेश चंदनशिवे, प्रमुख कार्यवाह धनंजय शिंगाडे, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, उद्योजक आशिष मोदाणी, नाट्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे आदींची उपस्थिती होती. या सोहळ्यात गुलाबराव कदम (गोंधळी), मंगलाताई बनसोडे (लावणी साम्राज्ञी), निरंजन भाकरे (भारूड प्रबोधनकार), आदिनाथ विभुते (पोवाडा), राजेंद्र अत्रे (साहित्यिक) आदींचा कै. गंगाधर शिंगाडे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. हा मेळावा दि.25 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार असून याचा जिल्ह्यातील लोककलावंत व रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मेळाव्याच्या संयोजकांनी केले आहे.

 
Top