उस्मानाबाद/प्रतिनिधी-नगर परिषद उस्मानाबाद येथे नगर परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. या प्रसंगी मुख्याधिकारी श्री. बाबासाहेब मनोहरे सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित त्यानंतर उस्मानाबाद न.प. चे 11 रोजंदारी कर्मचा-यांना कायम करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असता त्याप्रमाणे नगर पालिकेने शासनाकडे रितसर प्रस्ताव पाठवून सदर कर्मचा-यांना मागील वेतनातील थकबाकी रक्कम देण्याची व नोकरीत कायम करण्यासाठी विनंती केली होती सदर प्रस्तावाला मान्यता देऊन शासनाने वरील कर्मचा-यांना मागील वेतनातील रक्कमेसह नोकरीत कायम करून त्यांना स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 11 कर्मचा-यांना नोकरीत कायम केल्याचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, उस्मानाबाद न.प. चे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, जेष्ठ स्वतंत्र सैनिक सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, उस्मानाबाद न.प. चे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, जेष्ठ स्वतंत्र सैनिक सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.