उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नूतन पोलिस अधीक्षक राजतिक रौशन यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला . यावेळी मावळते पोलिस अधीक्षक आर राजा यांना निरोप देण्यात आला. श्री.रौशन नागपूर येथून बदलून आले आहेत. तर, मावळते पोलिस आधीक्षक आर.राजा यांची मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. श्री. रौशन यांनी जिल्ह्यात यापूर्वी सहायक पोलिस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले आहे. दरम्यान, गेल्या तीन वर्षांत जिल्हयात चो-यासह इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून ते रोखण्यासाठी आव्हान श्री. रौशन यांच्यासमोर आहे.
 
Top