कळंब/प्रतिनिधी-पानगाव ता.कळंब येथील प्राजंली गोरख कांबळे या विद्यार्थीनीला डॉ.प्रतापसिंह पाटील सोशल फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या ध्वजारोहन कार्यक्रमप्रसंगी समाजसेवक बाळासाहेब कथले व प्राचार्य सतिश मातने यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र खडबडे, समता परिषदेचे तालूका सचिव अशोक गोरे, विकास कदम, पटेल प्रा.श्रीकांत पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
यावेळी बाळासाहेब कथले यांनी डॉ. प्रतापसिंह पाटील हे समाजपयोगी कार्यास नेहमीच मदत करत आहेत,असे म्हणाले तर विकास कदम यांनी प्राजंलीला डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून मदत झाली ती तिच्या पुढील आयुष्यात बळ देईल असे सांगितले.
प्राचार्य सतिश मातने यांनी सांगितले की, डॉ.प्रतापसिंह पाटील हे कायम समाजकारणात रमणार व्यक्तीमत्व आहे.प्राजंलीची कहाणी ऐकल्यानंतर त्यांना अस्वस्थ झाल म्हणुनच त्यांनी प्राजंलीच्या परिस्थितीची खातरजमा करुन तात्काळ मदतीचा धनादेश आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून दिला कारण भावाने राखी बांधल्यानंतर भाऊ जी ओवाळणी देतो ती बहीणीच्या हक्काची असते ती ओवाळणी तिला अशी मदत देत नसतो त्याचपध्दतीने प्राजंलीने देखील डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी दिलेली मदत ही ओवाळणी समजावी व तिच्या वैद्यकिय शिक्षणासाठी समाजाने केलेल्या मदतीचे भान ठेवून भविष्यात सहा दिवस स्वत:साठी एक दिवस समाजासाठी अस काम वैद्यकिय क्षेत्रात करावे अशी अपेक्षा प्राचार्य सतिश मातने यांनी व्यक्त केली.शेवटी प्राजंलीने आपल्या मनोगतात सांगितले की मला चांगले गुण मिळवूनही माझा वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश होईल की नाही याची खात्री नव्हती पण समाजातील दानशूरांनी केलेल्या मदतीमुळे मी माझ पुढील शिक्षण घेऊ शकणार आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सारिका जाधव यांनी तर आभार शरद जाधव यांनी मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.आर.बी.चोंदे,विनोद कसबे यांच्यासह सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.