उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काजळा ( ता. उस्मानाबाद) येथील श्री सद्गुरू रामानंद महाराज देवस्थान सभामंडपाच्या कामासाठी पंधरा लाख रुपये निधीचे पत्र आ.ठाकूर यांच्या वतीने ह.भ.प. राम महाराज, देवस्थान समितीचे अध्यक्ष प्रकाश शेळके, सदस्य प्रकाश देशपांडे, उपसरपंच विजयदत्त पाटील, ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ शिंदे, राजू पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
श्री सद्गुरु रामानंद महाराज यांचे संजीवन समाधीचे हे शताब्दी वर्ष असल्याने येथील सभामंडपामध्ये आगामी काळात होणा-या भजन कीर्तन आणि प्रवचन अशा पारंपारिक कार्यक्रमाचा लाभ येणा-या भाविकांना घेता येणार आहे. आमदार ठाकूर यांनी सभामंडपास निधी दिल्याने येथील भाविकांच्या मनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शिंदे, जिल्हा परिषद सदस्य माउली राजगुरू आदी उपस्थित होते.