उस्मानाबाद/प्रतिनिधी-
सागली व कोल्हापूर आणि  परिसरातील पुरग्रस्थांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांना मदत व्हावी यासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षक,एन.एस.एस.विभाग,एन.सी.सी.विभाग यांचे वतिने प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली निधी संकलनासाठी उस्मानाबाद शहरातून फेरी काढण्यात आली.निधी संकलनाची सुरवात महाविद्यालयातून करण्यात आली प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी मदत बाॅक्समध्ये मदत टाकून सुरवात केली यावेळी प्रभारी प्राचार्य डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रभारी प्राचार्य बबन सुर्यवंशी,प्रा.अतुल देशमुख उपस्थित होते.ज्यु.विभागाची एक टिम बार्शी नाका,समतानगर ,शिक्षक काॅलनी ,काकडे पाॅल्ट या मार्गावर  फिरून त्यांनी निधी जमवला या टिमबरोबर प्रा .शेरखाने,प्रा.सौ.बी.व्ही.गोंदकर प्रा.घुगे,प्रा.कुटे आदी शिक्षक उपस्थित होते.तर वरिष्ठ विभागातील एक टिम आर्यसमाज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर,बस स्डॅड,भाजी मार्केट,नेहरू चौक बाजारपेठ,सोनारगल्लीतील  व्यापारी,दुकानदार,फळविक्रेते,रिक्षावाले,फुटपाथवरील विक्रेते,पानटपरीवाले,रस्त्यांनी चालणारे नाकरिक यांनी भरभरून निधी दिला व पुरग्रस्थाबद्दल आस्था दाखवत व त्यांच्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसवण्याच्या भूमिकेतून सहकार्य केले.अक्षरक्षा कांही फावडे टिकाव घेऊन कामाला निघालेल्या मजुरांनीही मदत केली.
निधी संकलनासाठी फेरी काढण्यात आली त्या विद्यार्थ्यांच्याबरोबर प्रा.एस.जी.नागरगोजे,प्रा.माधव उगीले,प्रा.डाॅ.केशव क्षीरसागर,प्रा.मोहन राठोड,प्रा.संदिप देशमुख,प्रा.राजा जगताप,प्रा.डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.महाडिक,प्रा.बालाजी क—हाडे,प्रा.मारूती लोंढे,प्रा.नगरे,प्रा.मंगेश भोसले आदी शिक्षक सहभागी होते.
उस्मानाबाद शहरातून केलेला संकलित निधी व महाविद्यालयाती   प्राचार्य,सिनियर विभागातील प्रत्येक प्राध्यापक पाचशे व ज्यूनियर विभागातील प्रत्येक शिक्षक आडीचशे आसा एकञित निधी व उस्मानाबादकरांनी दिलेली नविन कपडे हे सर्व प्रत्येक्ष सांगली येथे जाऊन देण्याचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी सांगितले आहे.
 
Top