उमरगा / प्रतिनिधी-
1 ते 7 ऑगस्ट दरम्यान सर्वत्र स्तनपान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. मात्र, स्तनदा मातांना सार्वजनिक ठिकाणी बाळाला दूध पाजण्या साठी असलेले हिरकणी कक्ष कुलूप बंद अवस्थेत असल्याने स्तनदा महिलांची कुचंबणा होत आहे.
शासनाने महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून शासकीय व सार्वजनिक ठिकाणी स्तनपाना साठी स्वतंत्र हिरकणी कक्षाची निर्मिती केली आहे. मात्र, बहुतांश ठिकाणचे हे हिरकणी कक्ष कुलूप बंद आहेत. तसेच अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरलेली असल्यामुळे या कक्षाचा महिलांना म्हणावा तसा उपयोग होत नाही. सध्या शासनाद्वारे स्तनपान सप्ताह मोठा गाजावाजा करून साजरा करण्यात येत आहे. जागोजागी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनर लावून विविध माध्यमातून प्रबोधनात्मक जाहिराती करण्यात येत आहेत. या उलट चित्र शहरातील बस स्थानकावर दिसून येते. मंगळवारी दुपारी बसस्थानका वरील हिरकणी कक्ष बंद होते. तसेच याबाबत विचारणा केली असता ते सतत कुलूपबंद असल्याची माहिती मिळाली.