लोहारा/प्रतिनिधी-लोहारा तालुक्यातील कानेगाव, आष्टामोड, मार्डी गावात भाजपा संघटन पर्व सदस्य अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या अभियानास लोहारा तालुक्यातुन चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 यावेळी प्रमुख म्हणुन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, भाजपा नोंदणी प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक राजेंद्र पाटील, पं.स. सदस्य वामन डावरे, सह नोंदणी प्रमुख  इकबाल मुल्ला, तालुका  सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस सुभाष गिरी, युवा मोर्चा  तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार,  विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, शाखा अध्यक्ष बालाजी कदम, परमेश्वर कदम, योगेश देवकर, धनराज कदम, दिगु देवकर, अदि उपस्थित होते. यावेळी महिला व पुरुषांची भाजप सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.  या कार्यक्रमास महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top