परंडा /प्रतिनिधी-
जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या प्रयत्नातून बार्शी उपसा सिंचन - हिंगणगाव जोड कालव्याद्वारे येणा-या पाण्यामुळे परंडा तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्प लाभक्षेत्रात हरितक्रांती घडणार आहे.आम्ही ऐवढ्यावरच थांबणार नसून.अगामी काळात शेतक-यांना कर्जमुक्त करणार आहोत.मी मते मागायला आलो नसून, मतदार राजांनी लोकसभा निवडणुकीत युतीला केलेल्या मतदानाबद्दल आभार मानण्यासह ज्या मतदारांनी मतदान केले नाही त्यांची मने जिंकण्यासाठी आलो असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
 व्यासपीठावर जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत, शिवसेना नेते सचिन आहिर,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, रुपेश कदम,शिवसेना जिल्हा परिषद गटनेते दत्ता साळुंके,जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, जिल्हा प्रमुख गौतम लटके, डॉ.तानाजीराव सावंत प्रतिष्ठिन अध्यक्ष रामचंद्र घोगरे, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन लांडगे, जिल्हा प्रमुख कैलास पाटील, मेघराज पाटील, रणजित पाटील, परंडा तालुका प्रमुख आण्णासाहेब लटके, भूम तालुका प्रमुख सुरेश कांबळे, भूम शहरप्रमुख गणेश शेंडगे,शिवसेना नगरसेवक रत्नकांत शिंदे, युवा शहरप्रमुख वैभव पवार, अॅड.रणजित मोटे, अमर साळुंके,न ाना कदम आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, शेतक-यांच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. थोड्याच दिवसांमध्ये या ठिकाणी पाणी येणार आहे त्यामुळे शेतक-यांनी आपली शेत जमीन विकू नये असा सल्ला युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. जन आर्शीवाद यात्रा ही माझ्यासाठी तीर्थयात्रा आहे आणि शेतकरी हे माझ्यासाठी देव आहेत. त्यांच्या पाठीशी मी नेहमी उभा राहणार आहे. महाराष्ट्रत शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. असे मत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सदरील योजनेच्या कामाचा शुभारंभ युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, जलसंधारण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते विधिवत पुजा करुन करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top