उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा भाजपच्या वतीने शहरातील समर्थ हॉटेल येथे जिल्ह्यातील शक्ती केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात आली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर होते,तर प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, मराठवाडा सदस्य नोंदणी अभियान प्रमुख नितीन काळे, प्रदेश सदस्य नितीन काळे, अँड. खंडेराव चौरे, अँड अनिल काळे, अँड व्यंकटराव गुंड अनिल काळे,सरचिटणीस संताजी चालुक्य,सतीश देशमुख,प्रभाकर मुळे,जिल्हा उपाध्यक्ष अँड नितीन भोसले,जिल्हा कोषाध्यक्ष नागेश नाईक,जिल्हा चिटणीस इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांनी आगामी काळात शक्ती सन्मान महोत्सव या निमीत्ताने प्रत्येक तालुका नुसार पूर्ण जिल्ह्यातून 10,000 हजार राख्या जमा झाल्या असून त्या राख्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांना पाठवण्यात येणार आहेत.यावेळी शक्ती केंद्र प्रमुख यांना आगामी काळात होणाऱ्या महाजनादेश यात्रेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.शक्ती केंद्र प्रमुखांनी कठोर परिश्रम घेऊन आपला बूथ मजबूत करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.तसेच जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी सदस्य नोंदणी अभियानमध्ये जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करावी असे यावेळी आ.ठाकूर म्हणाले.
या शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीसाठी सोशल मिडीया संयोजक प्रवीण पाठक जिल्हा चिटणीस गुलचंद व्यवहारे,जिल्हा उपाध्यक्ष मीनाताई सोमाजी,उस्मानाबाद शहराध्यक्ष संदीप कोकाटे,दत्तात्रय सोनटक्के, सुखदेव टोपें,सचिन इंगोले,आदम शेख,दिलीप पाटील,सत्यवान सुरवसे,माधव पवार,विक्रांत संगशेट्टी,विस्तारक,तसेच शक्ती केंद्र प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top