कळंब/प्रतिनिधी-औसा येथे दि.१६ आँगस्ट पासुन मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी औसा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे उपोषण कर्ते विजयकुमार घाडगे पाटील उपोषणास बसले आहेत ,लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी आहे त्यामुळे याही वर्षी पावसाळा संपत आला असून अद्यापही पाऊस झालेला नाही. या मागणीसाठी उपोषण सुरू आहे.त्याअनुषंगाने आज येथील तहसिल कार्यालया समोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन जिल्हा अध्यक्ष काकासाहेब राऊत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.या यध्ये मराठवाड्यातील दुष्काळी भागातील खरिपाची पीक शेतकऱ्यांच्या हातून गेलेने शेतकर्‍यांना प्रति एकरी पन्नास हजार रुपये तात्काळ देण्यात यावे,खरिपाचा पिक विमा सरसकट १००टक्के देण्यात यावा,मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी तुषार व ठिबक सिंचनाद्वारे शेती करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात यावे ,दुष्काळी परिस्थिती पाहता दुष्काळी मराठवाड्यातील शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी,दुष्काळी भाग म्हणून परिचित असलेल्या मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याची तात्काळ शाश्वत व्यवस्था करण्यात यावी,व जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करावी,मराठवाड्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण वीज बिले माफ करावे व 24 तास वीज देण्यात यावी. या मागणीसाठी आज कळंब तहसील कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. काकासाहेब राऊत यांच्यासह कळंब  तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल माने,तालुका अध्यक्ष युवा आघाडी आनंत झाडेके,वसुदेव पाचंगे (जिल्हाध्यक्ष आयटी विभाग)या वेळी या आंदोलनास लाल पँथर चे महासचिव हनुमंत भाऊ पाटुळे, शेतकरी क्रांती समिती कळंब, रयत क्रांती संघटना ,संभाजी ब्रिगेड,राजे प्रतिष्ठान, धनंजय भैय्या ताटे मित्र मंडळ, गोरसेना आदींनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.
 
Top