उस्मानाबाद /प्रतिनिधी-
शहरातील अन्न व औषध प्रशानाच्या कार्यालयाचे 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान शटर उचकटून जप्त केलेल्या प्रतिबंधीत अन्न पदार्थांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाचे कुलूप तोडून शटर उचकटून कोणीतरी अज्ञात चोरटयाने आत मध्ये प्रवेश करुन विद्युत पुरवठा बंद करून व सीसीटीव्ही केबल तोडून जप्त असलेल्या प्रतिबंधीत अन्न पदार्थाची चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागातील स्वप्नील सुमंतराव कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात रविवारी (दि.25) गुन्हा दाखल झाला.