प्रतिनिधी / उस्मानाबाद-उस्मानाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख योजनेंतर्गत विद्यार्थी वसतिगृहात फीसमध्ये तफावत असल्याचा आरोप करत ही तफावत दूर करावी या मागणीकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. 
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख योजने अंतर्गत वसतिगृहात फीसमध्ये तफावत निर्माण केलेली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांसमवेत आंदोलन करून याबाबत प्राचार्यांना विचारणा केली. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबविण्याची मागणी प्राचार्यांकडे करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी काॅँग्रेसचे जिल्हा समन्वयक राजसिंहा राजेनिंबाळकर, अमित पडवळ, सलमान शेख, धनराज नवले आदींसह शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 
Top