उस्मानाबाद/प्रतिनिधी -माजी नगरसेवक, औषध व्यापारी रतनचंद तिलोकचंद बेदमुथा (वय 70) यांचे पहाटे 4 वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. ३० रोजी कपीलधार येथील स्मशानभूमीत शोकाकुळ वातावरणात अंतीम संस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार व मोतीचंद बेदमुथा यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. त्यांनी 100 हुन अधिकवेळा रक्तदान केले होते. यावेळी मित्र परिवार, नातेवाईक, पत्रकार, राजकीय लोंकांची मोठी उपस्थिती होती.