ळजापूर/प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या वतीने कोल्हापूर सांगली सातारा येथील पुरग्रस्तांना पन्नास लाख रुपये मदत निधी देण्याचा निर्णय झाल्याची माहीती उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त चेतन गिरासे यांनी दिली .
या पुर्वी सिध्दविनायक ट्रस्ट मुंबई नंतर साई संस्थान शिर्डी यांनी कोट्यावधी रुपयांची मदत पुरग्रस्तांना जाहीर केली असुन त्यानंतर श्री तुळजाभवानी मंदीर ट्रस्ट ने पन्नास लाख रुपये मदत निधी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामधून पंचवीस लाख रुपये रोख मुख्यमंञी सहाय्यता निधीस दिले जाणार आहे तर उर्वरीत पंचवीस लाख रुपयाचे आवश्यक साहित्य रुपात मदत दिली जाणार आहे. मुख््यमंञी सहाय्यता निधीस धनादेश लवकरच देण्यात येणार आहे तर जे आवश्यक साहित्य रुपात द्यावयाचे आहे, त्याची यादी करण्यात येत असुन त्या नंतरच हे साहित्य दिले दिले जाणार आहे. तसेच देवीस भाविकांनी अर्पण केलेले वस्ञ ही भुकंग्रस्तांना दिले जाणार असल्याचे समजते.
श्री तुळजाभवानी संस्थानच्या वतीने यापुर्वी लोहारा येथे झालेल्या भुकंपग्रस्तांना वस्ञ रुपात मदत दिली होती. त्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात रोख व साहित्य रुपी मदत देण्यात येत असलेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे तसेच विश्वस्त आ. मधुकर चव्हाण उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, तहसिलदार योगीता कोल्हे यांचे अभिनंदन होत आहे.