तुळजापूर/प्रतिनिधी-
तुळजापूर-नळदुर्ग राज्यमार्गावर गंधोरा पाटीजवळ मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर व स्विफ्ट कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.24) दुपारी घडली. गंभीर जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे.
तुळजापूरहून नळदुर्गकडे जाणाऱ्या कंटेनर (जी.जे.32 टी 9146) आणि समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारची (के.ए.51 झेड 7497) गंधोरा (ता.तुळजापूर) शिवारात जोरदार धडक झाली.या अपघातात दोघेजण जागीच ठार झाले. तर दोघे गंभीर जखमी झाले. मृत कर्नाटकातील गुलबर्गा येथील आहेत. घटनास्थळी नळदुर्ग पोलिसांनी धाव घेतली तसेच दोन्ही जखमींना तुळजापूर रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे. अपघातात योगेंद्र उर्फ राजू नरेंद्र प्रसाद शुक्ला (54, रा. गुलबर्गा), नेहा राजू शुक्ला (48, रा. गुलबर्गा) यांचा मृत्यू झाला असून, स्वराज कानडे (35, रा. मुंबई) व मल्लीकार्जून मल्लपा (45,रा. गुलबर्गा) जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे.