प्रतिनिधी/परंडा-
शिक्षणमहर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील कौशल्य विकास केंद्राचे (ब्रॉडकास्टींग अॅन्ड जर्नालिझम , प्रोफेशनल अकाऊटींग अॅन्ड टॅक्सेशन ) उद्घाटन दि.16 ऑगस्ट रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कूलगुरु डॉ. प्रमोद येवले आणि प्रमूख पाहूणे म्हणून खासदार ओम राजेनिंबाळकर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा या संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि शिवसेना गटनेता दत्ता साळूंके यांची प्रमूख उपस्थिती राहणार आहेत अशी माहिती श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व शिक्षणमहर्षि गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी माहिती दिली आहे. यावेळी संस्थेच्या कार्यकारी मंडळातील अध्यक्ष सुनिल शिंदे, उपाध्यक्ष विक्रम उर्फ रामभाऊ पडवळ, माजी जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, सहसचिव प्रा.काकासाहेब शिंदे, कोषाध्यक्ष नवनाथ क्षिरसागर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.संपूर्ण विद्यापीठामध्ये केवळ याच महाविद्यालयामध्ये  सुसज्ज असे कौशल्य विकास केंद्र संस्थेने निर्मान केले असल्यामूळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातीलच नसून तर मराठवाडयातील  विद्यार्थाना या अभ्यासक्रमाचा  लाभ होणार आहे. या कौशल्य विकास अभ्यासक्रमामूळे विद्यार्थी स्वत: च्या पायावर उभे राहू शकतात. या उद्घाटन सोहळयासाठी जिल्हयातील शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संजय निंबाळकर आणि प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी केले आहे.
 
Top