वाशी /प्रतिनिधी- वाशी येथे इदगाह मैदानावर आज सकाळी 8 वाजता ईद ची नमाज पडण्यात आली नमाज नंतर सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तां साठी दुवा करण्यात आली तसेच सांगली कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करण्यास सुरुवात झाली यावेळी देशामध्ये अमन ,शांती .सुख समृध्दी नादावी व मराठवाडा वरील दुष्काळी परिस्थिती संपुष्टात यावी म्हणून दुवा करण्यात आली यावेळी पोलीस कर्मचारी,महसूल कर्मचारी उपस्थित होते तसेच श्रावण सोमवार निमित्त वाशी तालुक्यात घेतलेल्या कुरबानी न करण्याचा निर्णय सर्व मुस्लिम समाजातील लोकांनी काटेकोरपणे पाळला.