.
उमरगा/ प्रतिनीधी-अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभ रविवारी (दि ४) सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा उस्मानाबाद जिल्हा पालक न्यायमूर्ती व्ही . के .जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल अध्यक्षस्थानी होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस . बी .साळुंखे, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड . दिलीप सगर उपस्थित होते.
         यावेळी बोलताना न्यायमूर्ती व्ही . के . जाधव म्हणाले की, निझामकालिन काळात न्यायदान होण्यासाठी सन १९३७ ला पाच  तालुक्याच्या इमारतीसाठी राष्ट्रीय महामार्गालगत सात एकर जमीन देवून कै .शरणप्पा मलंग यांनी दातृत्व भाव जोपासला, त्यानंतर आता निर्माण होत असलेल्या सोयीयुक्त भव्य इमारतीचा ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. भव्य वास्तू उभारण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी न्याय मंदिर असे नावे दिसून येतात त्या मंदिरातील देव दर तीन वर्षांनी बदलत असतात. प्रमुख न्यायाधीश ओमप्रकाश जयस्वाल म्हणाले की, जिल्हा न्यायालय कामकाज करण्यासाठी सध्याची इमारत अपूरी पडत असल्याने जिल्हा न्यायालयाची स्वंतत्र नवीन इमारत होणे आवश्यक होते. इमारतीची रचना वन प्लस थ्री असून वरच्या इमारतीत सहा न्यायालय कक्ष, विधीज्ञ कक्ष, बैठक कक्ष, पक्षकारासाठी बसण्यासाठी विभाग, अभ्यासिका कक्ष, अपंग व्यक्तीसाठी लिफ्टची सोय यासह विविध सोयी सुविधा इमारतीत रहाणार असून पुढील पन्नास वर्षाच्या नियोजना प्रमाणे इमारतीच्या बांधकामाची रचना असल्याचे सांगितले. 
           यावेळी माजी खासदार रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, जितेंद्र शिंदे, बांधकाम सभापती अभय चालुक्य, दीपक जवळगे, किरण गायकवाड, तहसीलदार संजय पवार, डॉ मल्लिनाथ मलंग, डॉ चंद्रकांत महाजन, डॉ उदय मोरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, दिलीप भालेराव, मनोज सानप, महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मिलिंद ठोबडे, संचालक मिलिंद पाटील, भाजपचे संताजी चालुक्य, रामकृष्णपंत खरोसेकर, सभापती एम ए सुलतान, नानाराव भोसले, मे विक्रम इन्फ्रास्ट्रक्चरचे विक्रम गायकवाड, डॉ सुभाष वाघमोडे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका लोकरे, रेखा सूर्यवंशी, डॉ श्रीनिवास जाधव, डॉ डी एस थिटे, दिवाणी न्यायाधीश एन. के. कारंडे, प्रथम वर्ग न्यायाधिश एम. टी. बिलाल, न्यायाधिश एस एम चव्हाण, न्यायाधिश ए डी पाटील, विधिज्ञ मंडळाचे सचिव ॲड एस पी इनामदार, ॲड पी एन पणूरे, ॲड व्ही एस आळंगे, ॲड. प्रविण तोतला, ॲड एम डी गायकवाड, ॲड. मल्हारी बनसोडे, ॲड आर. एम. इंगळे, ॲड. ख्याजा शेख, ॲड. एम पी कोथिंबरे, ॲड. मोहन चिंचोलीकर, ॲड संजय पत्रिके, शासकीय अभियोक्ता ॲड संदिप देशपांडे, ॲड सुषमा घोडके यांच्यासह जिल्ह्यातील न्यायधिश, विधीज्ञ व नागरिक उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश एस बी साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. संजय मैंदर्गी यांनी सूत्रसंचलन केले. विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड दिलीप सगर यांनी आभार मानले.
 
Top