प्रतिनिधी / उस्मानाबाद-
जिल्ह्यातील भूकंपग्रस्तांना सरसकट प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी उस्मानाबाद येथील प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी (दि. 31) जिल्हाधिकारी कर्यालयासमोर टाळ मृदंगासह जेलभरो आंदोलन करण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष प्रमोद कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उस्मानाबाद येथे विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केले. 1993 मध्ये महाप्रलकारी भूकंपमध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले, हजारोंची घरे जमीनदोस्त झाली. त्यावेळी शासनाने 34 हजार 500 व 17 हजार रुपये अशी मदत केली. त्यावेळी ज्यांना 34 हजार 500 रुपये मदत मिळाली. त्यांना भूकंपग्रस्त प्रमानपत्र वितरित करण्यात आले. परंतु, ज्यांना 17 हजार रुपये मदत केली, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. या आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही तर येणा-या 15 दिवसांत तीव्र आंदोलन करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष अण्णासाहेब दराडे यांनी दिला. या वेळी प्रहारचे केदार सौदागर, शशिकांत मुळे, मनोज जाधव, प्रजय पवार, प्रतीक दराडे, दयानंद राठोड, अजित हुंडेकरी, राघवेंद्र चाबुकस्वार, शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.