उस्मानाबाद/प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणात कपात करण्यात आलेल्या आद्यादेशाच्या विरोधात ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती उस्मानाबाद यांच्या वतीने शासनाच्या विरोधात आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ग्रामविकास विभागाने राज्यातील या काढलेल्या आद्यादेशाचा तीव्र निषेध करण्यात आला.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी विधिमंडळाच्या अधिवेशनात या संबंधित विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. परंतू ते मंजुर झालेले नाही, असे असताना देखील या शासनाने ओबीसी आरक्षणाला कात्री लावण्याचा अध्यादेश काढुन संपुर्ण ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. तरी हा अध्यादेश रद्द करून अपेक्षित ओबीसींना आश्वस्त करावे अन्यथा आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातील ओबीसी बांधव रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने लढा देऊन होणा-या परिणामाला पुर्णत; शासन जबाबदार राहिल याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले.
या आंदोलनात पांडुरंग लाटे,महादेव माळी,रवि कोरे आळणीकर,लक्ष्मण माने,भारत डोलारे,युवराज नळे,मुकेश नायगावकर,धनंजय शिंगाडे,नवनाथ राऊत,अँड गणपती कांबळे,सतिश कदम,विजयकुमार बोंधर,बाळु चव्हाण,सतिश लोंढे,धनंजय राऊत,अभिजित गिरी,किशोर राऊत,ज्ञानेश्वर पंडीत,सुनिल पवार,बाळासाहेब झेंडे, आदिसह ओबीसी समाजातील प्रत्येक जातीचे समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
 
Top