उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद शहरासह पुर्ण जिल्हयात भारत देशाच्या स्वातंत्र्याचा ७२ वां वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त कांही ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
उस्मानाबाद नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहन होणार आहे. तर उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन होणार आहे.  तर मुख्य कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात होत आहे. पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमास खा. ओमराजे निंबाळकर, आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे, पोलिस अधिक्षक  आर राजा, जिल्हा परिषद चे सिईओ डॉ. संजय कोलते, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत. 
 
Top