प्रतिनिधी/उस्मानाबाद-
गेल्या ७३ वर्षांपासून माळी समाजाला सत्तेपासून वंचित कांग्रेस व राष्ट्रवादी ने ठेवले आहे. सत्ता संपादन करण्यासाठी रविवार दि.१५ सप्टेंबर २०१९ रोजी संत शिरोमणी सावता महाराज तिर्थक्षेत्र अरण ता.माढा जि.सोलापूर येथे राज्यव्यापी सर्वशाखीय माळी समाज सत्ता संपादन महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास वंचित बहुजन मेळावे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती महामेळावे प्रमुख निमंत्रक शंकरराव लिंगे यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.
माळी समाजाचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विकास करणे, समाजाच्या प्रलंबीत मागण्याची पुर्ती करणे, संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तिर्थक्षेत्र अरण ला अ वर्ग देणे आदी मागण्या मंजुर करून घेण्यासाठी समाजाचा दबाब असणे आवश्यक आहे. त्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पत्रकार परिषदे मध्ये गौतम क्षिरसागर, पांडुरंग माळी, महेश सुरवसे, चंद्रशेखकर सुरवसे आदी उपस्थित होते.
बी टीम कोण
या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकारांनी आपण भाजपावर टिका करून वंचित बहुजन आघाडी जात आहात पण वंचित बहुजन आघाडी भाजपा ची बी टीम असल्याचे कॉंग्रेस ने टिका केल्याचे सांगितले. त्यावेळी शंकरराव लिंगे यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी न मागता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपा पाठींबा दिला होता. त्यामुळे बी टीम कोण आहे, आपण ठरवा असे सांगितले. 
 
Top