उस्मानाबाद/प्रतिनिधी-
रूपामाता परिवाराकडून सत्कार स्विकारताना अंत्यत आनंद होत आहे. या परिवाराने सचोटीने काम करून उद्योगाचे मोठे जाळे उभारले आहे, आणि हे जाळे उभारताना रूपामाता परिवाराने गुणवत्ता संभाळल्यामुळेच सहकार क्षेत्रात ठसा उमठविला आहे,  असे प्रतिपादन महाराष्ट्र अॅन्ड गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत विजयी झालेले ज्येष्ठ विधिज्ञ अॅड मिलींद पाटील यांनी केले.
रूपामाता उद्योग समुहाच्या वतीने अॅड. मिलींद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उद्योग समुहाचे अध्यक्ष अॅड. व्यंकटराव गुंड, संचालक राजाभाऊ वैद्य, ज्ञानदेव राजगुरू, उद्योग समुहाचे एम.डी. भगीरथ जोशी, भाजपाचे बाळासाहेब क्षिरसागर,हरिश्चंद्र बुलबुले, अॅड. चौरे,सोपान नरवडे, बाबा वीर, मिलींद खांडेकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अॅड. मिलिंद पाटील यांनी अॅड. व्यंकटराव गुंड यांनी उभारलेल्या या उद्योगात जास्त लक्ष घालावे, राजकारण कमी केले तरी चालेल पण उद्योगाच्या लावलेल्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर करावे, आपण माझ्या हयातीमध्ये भाजपाचा आमदार झालेला  मला पाहिला आवडेल, अशा शुभेच्छा दिल्या.  कार्यक्रमाच्या प्रारंभी अॅड.व्यंकटराव गुंड यांनी अॅड. मिलींद पाटील म्हणजे दिनदुबळ्यांचे प्रतिनिधी असून आम्ही चुकून इकडे तिकडे फिरलो तरी अॅड.पाटील यांनी आमच्या परिवाराची नाळ कधी तोडली नाही. अॅड. पाटील यांनी बार कौन्सिलचे चेअरमन होऊन विधिज्ञा समोर असलेल्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिरथ जोशी यांनी केले. तर आभार समुहाच्या सल्लागार अॅड. विद्युलता दलभंजन यांनी मानले.  यावेळी उद्योग समुहाचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 
Top