लोहारा/प्रतिनिधी
 लोहारा तालुक्यातील अचलेर येथील गुरव युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने युवा नेते लोकमंगल उद्योग समुहाचे चेअरमन रोहन दादा देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबाद शहरात आखिल गुरव समाज यांच्यावतीने दहावी व बारावीतील व इतर क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आखिल गुरव समाज राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन युवा नेते  लोकमंगल उद्योग समुहाचे चेअरमन रोहन दादा  देशमुख, अदि उपस्थित होते. यावेळी लोहारा तालुक्यातील अचलेर येथील गुरव युवा  प्रतिष्ठाण यांच्यावतीने युवा नेते लोकमंगल उद्योग समुहाचे चेअरमन रोहन दादा देशमुख यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अचलेर येथील गुरव युवा प्रतिष्ठाणचे अमोल अशोक पुजारी, ज्ञानेश्वर भालचंद्र पुजारी, शरद सोमण्णा पुजारी सर, नरेश चंद्रकांत पुजारी, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top