परंडा/हारून शेख-
 त्यालुक्यात गेल्यावर्षी अत्यल्प पाऊस झाला होता.यंदाही समाधानकारक पाऊस होईल असे हवामान खात्याने वर्तविले होते. त्यामुळे दुष्काळा
ने होरपळणा-या शेतक-यांच्या आशा उंचावले होत्या. परंतु रोहिणी, मृग,आद्रा, पुनर्वसू या नक्षत्रात एकही जोरदार पाऊस झाला नाही.आता पुष्य नक्षत्र सुरू झाले आहे.आता पुष्य या नक्षत्राकडे शेतक-यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. पाऊसा आभावी तालुक्यात हजारो हेक्टर वरिल पेरण्या खोळंबले आहे. ज्या शेतक-यांनी अल्पशा झालेल्या पाऊसावरच पेरण्या केल्या होत्या. आता त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट समोर उभे राहिले आहे. अधीच दुष्काळ आणि दुबार पेरणीमुळे दुष्काळात तेरावा महिना या म्हणी प्रमाणे शेतक-यांचे हाल होत आहे.
या वर्षाच्या हंगामात पाऊस आर्द्र नक्षत्रात 64 मिलीमीटर इतकाच झाला 6 जूलै पासून पुनर्वसू नक्षत्राला सुरवात झाली. हा नक्षत्र ही कोरडाच गेला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत 6 जुलै पर्यंत 129 मिलीमीटर पाऊस झाला होता.तर यंद64मिलीमीटर म्हणजेच गेल्यावर्षाच्या तुलनेत66 मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. गेल्यावर्षी खरीप व रब्बी हंगामा दोन्ही वाया गेल्याने शेतक-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे यंदाचा खरीप हंगामा पदरात पडेल अशा आपेक्षा शेतकऱ्यांच्या होत्या मात्र यंदाही पाऊसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रिमझीम स्वरूपात पडणा-या पावसावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, तुर , कापूस आदी पिकांच्या पेरणीचे धाडस केले आहे. त्यात तालुक्यात अत्तापर्यंत 39.54 टक्के क्षेत्र पेरणी झाली आहे. पावसाअभावी कांही गावातील शेतक-यांनी थुळ पेरणी केली आहे. दरम्यान जून महिण्यात ही जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतक-यांचे नजरा आता पुष्य नक्षत्राकडे लागले आहेत. जुलै महिना जवळ जवळ संपत आला आहे. तरी आज्ञापपर्यंत अपेक्षीत असा पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीन, तुर, मुग, सुर्यफुल आदींची पेरणी रखडली आहे.परिणामी आजही तब्बल 60 टक्के क्षेत्र पेरणी विना पडून आहेत.
 तालुक्याची पाऊसाची सरासरी पर्जन्यमान 615 मिलीमीटर आहे. प्रत्यक्षात वार्षीक सरासरी नुसार अत्यल्प पाऊस झाला आहे. यामध्ये परंडा मंडळात 71 मि.मी.जवळा 63 मि.मी.आसू 38 मि.मी. सोनारी 27 मि.मी.तर आनाळा मंडळात सर्वाधीक 131 मि.मी. पुर्जन्यमान  झाले.तालुक्यात सर्वाधीक पाऊसाची नोंद आनाळा मंडळात झाली असून सर्वात कमी पाऊस सोनारी मंडळात आहे. आशा या झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला असून आता शेतकऱ्यांचे डोळे पुष्य नक्षत्राकडे लागले आहेत.
 
Top