जळकोट /प्रतिनिधी- तुळजापूर तालुक्यातील जळकोट पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मानमोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस नुकतेच आय.एस.ओ. 9001 : 2015 प्रमाणपत्र मिळालेले आहे त्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील एक नामांकित सामाजिक संस्था हॅलो मेडिकल फाऊंडेशनच्या चमूने दिनांक 25 जुलै 2019 रोजी शाळेस भेट देऊन शाळेत केलेल्या प्रगतीविषयी व राबवलेल्या उपक्रमाविषयीची माहिती जाणून घेऊन शाळेच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.  या बाबत थोडक्यात वृत्तअसे की तुळजापूर तालुक्यातील मानमोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक विक्रम पाचंगे आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी शाळा आय.एस.ओ. करण्यासाठी शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांची बौद्धिक, मानसिक,शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी राबवलेले उपक्रम, ई-लर्निंग, त्यातच मुलींसाठी राबवलेले व राबवत असलेले विशेष उपक्रम आदी बाबींचा विचार करून आय. एस. ओ. 9001: 2015 प्रमाणपत्र मिळाले असल्याने त्याची माहिती घेण्यासाठी राज्यात नावलौकिक मिळवलेली अणदुर तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील नामांकित सामाजिक संस्था हॅलो मेडिकल फाउंडेशन च्या चमुने उपरोक्तपणे  शाळेस भेट देऊन सत्यासत्यता पडताळून घेतली व केलेल्या कार्याचे कौतुक केले सदर चमूमध्ये पुणे येथे कार्यरत असलेले सुजितसिंग, रमेश पाटील, राहुल कदम,सुपरवायझर संग्राम पाटील,श्रीकांत कुलकर्णी,जिल्हा समन्वयक सतीश कदम  अॅनीमेटर विजयकुमार गाडे आदी सहभागी होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक विक्रम पाचंगे, सहशिक्षक रमेश दुधभाते,  रामकृष्ण मोहिते,  सहशिक्षिका सुचेता चव्हाण आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
Top