उमरगा/प्रतिनिधी-
शिवाजी महाराजांचे नांव घेऊन काही लोक राजकारण करतात पण महाराज आमच्या ह्रदयात आहेत. कॉग्रेस पक्ष ही एक विचारधारा आहे. विचार कधीही संपत नसतो. कॉग्रेसमध्ये बलीदानाची परंपरा आहे. कॉग्रेसच्या विचारधारेमुळे एकसंघ ठेवू शकलो. कॉग्रेसने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. कॉग्रेस कधीही संपणार नाही. कॉग्रेसची विचारांची लढाई आहे. आपण दिलेल्या प्रेमामुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो आहे. माझा मान आणि शान उंचावण्यासाठी आमदार निवडून द्या असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष
आ. बसवराज पाटील यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उमरगा व लोहारा तालुक्याच्या वतीने उमरगा येथे आमदार बसवराज पाटील यांचा गुरुवारी दि. 25 रोजी नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरण पाटील, उमरगा पंसचे सभापती अॅड. राजेसाहेब पाटील, उमरगा जनता बँकेचे अध्यक्ष रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष अॅड. सुभाष राजोळे होते. यावेळी उमरगा नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे, मुरुम नगराध्यक्ष सौ. अनिता अंबर, जिप सदस्य प्रकाश आष्टे, रफीक तांबोळी, धनराज हिरमुखे, डॉ शालिनी जीवनगे, बाबुराव शिंदे, नानाराव भोसले, जालिंदर कोकणे, युवक कॉग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पवार, माजी सभापती मदन पाटील, अॅड. इरसिंगप्पा आळंगे, अॅड दिलीप सगर, संगिता कडगंचे, शालिनी सरपे, नगरसेवक एम ओ पाटील, विक्रम मस्के, अतिक मुन्सी, वसीम शेख, महेश माशाळकर, पप्पु सगर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की, तुमची प्रचंड ताकत पाठीमागे असल्यामुळे मी
युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष प्रदेश कार्याध्यक्ष पदापर्यंत पोहोचलो. आव्हान पेलणे, संघर्ष करणे यांची आम्हाला आवड आहे. उमरगा तालुक्यात कॉग्रेसचा आमदार निवडून दिलो तर मला दिलेल्या पदाचे सार्थक होईल. उमरगा-लोहारा तालुक्याचा आमदार कॉग्रेसचा निवडून द्या मी विकासाचे मॉडेल बनवुन दाखवतो. जात पात न बघता विधानसभेला आमदार निवडून द्या. एखादया चांगल्या डॉक्टरकडून उपचार घेताना, एखादा खेळाडू, अभिनेता यांची जात कधीही पाहत नाही. मग निवडणुकीतच जात का पाहतो ? कारखाना, उपजिल्हा रुग्णालय, एम आय डी सी, जिल्हा कोर्ट ही सगळी कॉग्रेसच्या काळात झालेली काम आहेत. सलग 35 वर्ष उमरगा पंचायत समिती कॉग्रेसच्या ताब्यात आहे. राज्यात व केंद्रात त्यांची सत्ता असताना आपला तालुका दहा वर्षांत विकासापासून वंचित आहे. कार्यकर्त्यांनी जनतेचा विश्वास संपादन करा. विचाराने माणसं जोडा. सर्वसामान्य जनतेच्या सुखदु:खात सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आ. पाटील यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आ. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्हास घुरघुरे, प्रास्ताविक दिलीप भालेराव यांनी तर चंद्रशेखर पवार यांनी आभार मानले.