कळंब /प्रतिनिधी - कळंब तालुक्यातील सौदणा (अंबा) येथील श्रुती सतीश पालकर ही जिल्हा परिषद शाळा सौदणा अंबा येथे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होती. दिनांक 8 जुलै वार सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली असताना ति खेळत असताना चक्कर येऊन पडली. तिला तात्काळ लातूर येथील मुंडे स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते . तिला (जी बी एस) नावाचा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला दुरूस्त करण्यासाठी साडे चार लाख रुपये रूपये खर्च अपेक्षित होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. पुढील उपचारासाठी तिला मुंबई येथील जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्या उपचारासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तर एक कर्मचारी तिथे तिच्या मदतीसाठी चोवीस तास ठेवला होता . सौदणा येथील ग्रामस्थांनी व ईतर समाजातील दानशूर व्यक्तींनी. पन्नास हजार आर्थिक मदत केली होती. पण सर्वांचे प्रयत्न आणि श्रुतीची जी बी एस नावाच्या आजारापुढे झुंज कमी पडली. काल सकाळी दहा वाजता श्रुती ने जे जे हॉस्पिटल मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाची वार्ता समजल्यावर सौदणा व परीसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. काल रात्री सौदणा (अंबा) येथे उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.श्रुतीची मृत्यूशी झुंज संपली;जे जे हॉस्पिटल मुंबई येथे घेतला अखेरचा श्वास
कळंब /प्रतिनिधी - कळंब तालुक्यातील सौदणा (अंबा) येथील श्रुती सतीश पालकर ही जिल्हा परिषद शाळा सौदणा अंबा येथे इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत होती. दिनांक 8 जुलै वार सोमवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली असताना ति खेळत असताना चक्कर येऊन पडली. तिला तात्काळ लातूर येथील मुंडे स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते . तिला (जी बी एस) नावाचा आजार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिला दुरूस्त करण्यासाठी साडे चार लाख रुपये रूपये खर्च अपेक्षित होता. घरची परिस्थिती बिकट असल्याने तिला समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. पुढील उपचारासाठी तिला मुंबई येथील जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिच्या उपचारासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कसोशीने प्रयत्न केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तर एक कर्मचारी तिथे तिच्या मदतीसाठी चोवीस तास ठेवला होता . सौदणा येथील ग्रामस्थांनी व ईतर समाजातील दानशूर व्यक्तींनी. पन्नास हजार आर्थिक मदत केली होती. पण सर्वांचे प्रयत्न आणि श्रुतीची जी बी एस नावाच्या आजारापुढे झुंज कमी पडली. काल सकाळी दहा वाजता श्रुती ने जे जे हॉस्पिटल मुंबई येथे अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाची वार्ता समजल्यावर सौदणा व परीसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. काल रात्री सौदणा (अंबा) येथे उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.