दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन ढासळत चाललेल्यानेच पावसाचे प्रमाण कमी कमी होत आहे. पर्यावरणाच्या योग्य संतूलनासाठी आता वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. जेवळी येथे म्हाडाच्या वतीने वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम हाती घेतले असून यासाठी येथील नागरिकांनी वृक्ष वाढीसाठी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा अधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी केले. शासनाच्या सन २०१९ च्या ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद मंडळाच्या वतीने कार्यकक्षेतील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे तीन हजार वृक्ष लागवड करीत आहेत. यासाठी येथील रहिवाशी असलेले महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुंबई येथे उपअभियंता म्हणून कार्यरत असलेले सुनील देशपांडे यांनी म्हाडाच्या वतीने येथे वृक्ष लागवडीचा पुढाकार घेतला असून येथे तीन हजार वृक्ष लागवडीसाठी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांनी आता मंजुरी दिली आहे. येथे अंदाजे चार फूट उंचीचे विविध मिश्र जातिचे वृक्ष संरक्षण
जाळीसह ग्रामपंचायतीने सुचविलेल्या जागेत लावण्यात येणार असून यांच्या संगोपनाची जबाबदारी ही येथील ग्रामपंचायतीकडे देण्यात आली आहे. लोहारा तालुक्यातील जेवळी येथील महिला मंडळ सभागृहासमोर दि.२४ जुलै रोजी वृक्षारोपनाचा सुमारंभ जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कर्यक्रमात जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण औरंगाबाद विभागाचे मुख्याधिकारी अण्णासाहेब शिंदे, सहाय्य जिल्हा अधिकारी विवेक जॉनसन, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे स्वीय सहाय्यक सुनील देशपांडे, तहसीलदार विजय अवधाने, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई तोरकडे, शिवसेना तालुकाप्रमुख तथा सरपंच मोहन पणुरे, पंचायत समितीचे सदस्य व्यकंट कोरे, टाटा समूहाचे उपाध्यक्ष अमृतराज मोरे, उस्मानाबाद येथील म्हाडाचे उप अभियंता मिलिंद अटकळे, प्रभारी गटविकास अधिकारी एस.पी. काळे, तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग, शाखा अभियंता हरिभाऊ देशमुख, रमेश बिराजदार, लघुपाटबंधारे शाखा अभियंता ई. टी. सुर्यवंशी, सरपंच (दक्षिण जेवळी) चंद्रकांत साखरे, उपसरपंच मल्लिनाथ डिग्गे, शामसुंदर तोरकडे, बाळासाहेब देशपांडे, अशोक भुसणे, चंद्रकांत ढोबळे, सुरेश दंगचले, गुंडाप्पा कारभारी, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर येणेगुरे यांनी केले तर आभार सरपंच मोहन पुरे यांनी मानले.
