उस्मानाबाद/प्रतिनिधी-शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे २०१८-१९ मध्ये रेशीमशास्त्र विभागात पदवीत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेऊन विशेष प्राविण्यासह बालाजी पवार यांनी महाराष्ट्रात शेतक-यांमधून रेशीमशास्त्र विभागाची पहिली पदवित्तर पदवी प्राप्त केली आहे. त्याबद्दल त्यांचे कुलगुरू देवानंद शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील अक्कुबाई पाडोळी येथील बालाजी प्रभाकर पवार रेशीम उद्योगाबाबत अनेक नवीन-नवीन प्रयोग करीत आहेत. जिल्हयातील ५५ शेतक-यांना त्यांनी शिवाजी विद्यापीठात ट्रेनिंग दिले. १० शेतक-यांना रेशीम डिप्लोमा करण्यास मदत केली आहे. रेशीम शास्त्र विभागत पदवी मिळाल्यामुळे अनेकजण शासकीय कार्यालयात नौकरीस लागल्याचे ही बालाजी पवार यांनी सांगितले. परंतू शेतक-यामधून पदवीत्तर पदवी प्राप्त करण्यास मला यश आले. बालाजी पवार यांचे रेशीमशास्त्र विभागातील प्रा. मन्ने सर, जाधव सर यांनी विशेष कौतुक केले.