उस्मानाबाद/प्रतिनिधी-
अखिल गुरव समाज संघटना उस्मानाबाद यांच्या वतीने रविवार दि.२१ जुलै रोजी समाजातील १० वी १२ वर्गातील प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांचा गुणगौरव समारंभ भाजपाचे युवा नेते रोहन देशमुख यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.अण्णासाहेब शिंदे राहणार आहेत.
यशराज मंगल कार्यालय, नगर परिषद जवळ, उस्मानाबाद येथे होणा-या कार्यक्रमास नगरसेवक युवराज नळे, युवसेना गटनेता सोमनाथ गुरव, समाजाचे प्रदेशाध्यक्ष आबासाहेब शेलार, प्रदेश युवक अध्यक्ष रंगनाथ गुरव, महिला प्रदेशाध्यक्षा सुरेखाताई तोरडमल, नगरसेवक मंगेश बिराजदार, गणेश पुजारी, किशोर पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ नळेगांवकर, अॅड.प्रशांत खंडाळकर सुदर्शन मोकाशे, सचिन धारूरकर, मोहन गुरव आदीं ने केले आहे. 
 
Top