कसबे तडवळे हे उस्मानाबाद जिल्हयातील एक ऐतिहासिक गाव. गावाचे नाव जरी कसबे तडवळे असे असले तरी या गावाच्या रेल्वे स्टेशनला नाव मात्र कळंब रोड असे आहे. फार पुर्वीपासुन या नावाने हे गाव प्रसिध्द आहे. पण आलीकडे हे गाव शिक्षणाची पंढरी बनू पहात आहे नव्हे म्हणायला काही हरकत नाही. त्याला कारणही तसेच विशेष आहे.आज शिक्षणामध्ये लातुर पॅटर्न जसा प्रसिध्द झाला आहे तसा तडवळे म्हटले की नवोदय शिष्यवृत्ती पॅटर्न म्हणुन या गावच्या पंचक्रोशीत नव्हे तर संपुर्ण जिल्हाभरासह राज्याला या गावाची या पॅटर्न मुळे नवीन ओळख होऊ पहात आहे.
तसे या गावची तब्बल १२५ च्यावर विद्यथ्र्यांनी जवाहर नवोदय तुळजापूर येथे प्रवेश मिळवुन उच्च दर्जाचे सीबीएसई अभ्यासक्रम पुर्ण करून आपले शिक्षण पुर्व केले आहे. जे शिक्षण घेण्यासाठी महागडया शहरात लाखो रूपये खर्च करूनही या दर्जाचे शिक्षण गोरगरिब विद्याथ्र्यांना शक्य नाही तर स्वप्र बघेणे देखील अशक्य आहे. एकाच गावातील एवढे विद्यार्थी नवोदयला लागण्याचे भारतातील हे एकमेव गाव आहे.
अशा प्रकारचे विद्याथ्र्यांचे स्वप्न पुर्ण करण्यचे काम या गावात ध्येयवेडे शिक्षक श्री.धायगुडे जगन्नाथ व श्री. गावखरे सर यांनी १५ वर्षापुर्वी सुरू केलेले कार्य आजही अखंडपणे यशस्वीपणे चालू आहे. या कारणाने आज नवोदय व शिष्यवृत्ती पॅटर्न या गावात निर्माण झाला याचे सर्वस्वी श्रेय या शिक्षकांना दिले जाते. या पॅटर्नचे जनक म्हटले तरी चालेल. कारण की श्री.धायगुडे सरांनी या पॅटर्न साठी सन २००६ पासुन स्वत:ला अगदी संपुर्ण वहावुनच घेतले आहे. तेही नियमितपणे कोणत्याही प्रकारचा खंड माझ्या माहितीप्रमाणे आजतागायत पडलेला नाही.
काय आहे तडवळा पॅटर्न ?
ज्ञानदेवे रचीला पाया तुका झालासे कळस या अभंगाच्या ओवीला साजेल असा हा तडवला पॅटर्न
सन १८६४ साली म्हणजे स्वातंत्र्यापुर्वी इंग्रजाच्या काळात सुरू झालेल्या या शळा सन १९४१ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्श लाभलेल्या या शाळांनी अनेक सुजान व सुसंस्कृत नागरिक घडवत आलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन शाळा तशा या गावात तीन जिल्हा परिषदेच्या शाळा व एक जगदाळे मामांची जयहिंद विद्यालय शिक्षणप्रवाहासाठी सतत ज्ञानदानाचे कार्य करत आलेल्या शाळा. यसापैकी जि.प.आदर्श केंद्रीय शाळा व जि.प.आदर्श कन्या शाळा कसबे तडवळे या दोनही शाळा या पॅटर्नसाठी प्रसिध्दीस आलेल्या शाळा.
मागील तेरा वर्षापासुन याच गावचे सुपुत्र श्री.धायगुडे व सहकारी शिक्षकांनी आणलेला हा वारसा आणखी मोठया जोमाने सन २०१६ मध्ये आलेले याच गावचे सुपुत्र श्री.बाळासाहेब जमाले श्री.रहिमान सय्यद यांनी त्याच दिशेने श्री.धायगुडे सरांच्या मार्गदर्शनाने व सर्व शिक्षकबांधवांच्या सहकार्याने यशस्वी चालू ठेवत हा पॅटर्न निर्माण केला. आज जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे तडवळा गावातील इयत्ता सहावी ते बारावी च्या वर्गात एकुण ६५ पैक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी यात मोठया संख्येने वाढच होत आहे.
या दोन्ही शाळेत सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते रात्री आठ या शाळेच्या व्यतिरिक्त जादा वेळ देऊन कन्या शाळेत श्री.धायगुडे सर, श्री. पुरी सर, मुख्याध्यापक श्री.सय्यद रहिमान सर व सहकारी शिक्षक तर केंद्र शाळेत श्री.जमाले सर, श्रीम.कदम मॅड, श्री.जानराव सर व सहकारी शिक्षक हा पॅटर्न यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बहुतांशी सर्व विद्यार्थी हे गोरगरिबांची शेतकरी, शेतमजुरांची ही मुले यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता अगदी विनामोबदला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस एकही सुट्टी अथवा रजा न घेता अविरत हे ज्ञानदानाचे कार्य हे गावचे सुपुत्र करताना सर्वांना अभिमान वाटतो. कुठे लाखो रूपये खर्च करून विकत घेतलेले ज्ञान व येथे मिळणारे ज्ञान ही विषमता मनाला स्पर्श करून जाते.
हे सर्व काहीतरी स्वार्थ किंवा मानसन्मासाठी चाललंय असही कधीकधी ऐकावयास मिळते तर कधी बालमनावर अन्याय जीवघेणी स्पर्धा आहे असंही ऐकायला मिळते पण आजपर्यंत अशी कोणतीही साधी अथवा विचित्र घट ना यामुळे घडलेली नाही. या उपलट पाच मिनीट जरी तासाला उशीर झाला तरी विद्यार्थी विचारताना दिसतात. याला कारणही तसंच आहे नव्हे या पॅटर्नच यशच याच कारणात आहे. येथे कोणत्याही विद्याथ्र्यांला अथवा पालकांना सक्ती केली जात नाही. अध्यापन पध्दती विद्यार्थीकेंद्रीत व मनोरंजनातुन ज्ञानाकडे अशी आहे.
या गणित भाषा बुध्दीमत्ता हे विषय प्रामुख्याने या जादा तासाच्या वेळी घेतले जातात. येथे विद्याथ्र्यांच्या बुध्दीला चालना कृतीला वाव व अवांतर वाचनास संधी उपलब्ध करून दिली जाते. हे सर्व करत असताना बालमनाला कोणताही ताण येणार नाही याकडे अगदी कटाक्षाने दक्षता घेतली जाते. घोकमपट्टीला वाव नाही. कोणत्या बाबतीत सातत्याला व सरावाला अतिशय महत्व दिले जाते. मला हे सर्व ज्ञान का आहे तर या दोनही शाळेत सेवेची मला संधी मिळालेली आहे. डिसेंबर २०१६ ते आक्टोबर २०१८ केंद्र शाळा तर ऑक्टोबर २०१८ ते आजतागायत मुख्याध्यापक म्हणुन कन्या शाळेत सेवेची संधी मिळालेली आहे.
हया यशामागचे आणखी एक कारण सांगता येईल ते म्हणजे इयत्ता दुसरी पासुन असणारा अभ्यासक्रम व पुर्वतयारी ही ते. ते वर्गाशिक्षक अगदी नियमित व सातत्याने घेऊन फार मोठे सहकार्य करतात. म्हणतात ना ज्यांचा पाया पक्का तो कोठेही कमी पडत नाही. खर पहाता इयत्ता दुसरी पासुन या पॅटर्नकउे वाटचाल सुरू होते.
या पॅटर्न गावातील प्रतिष्ठीत नागरिक, पालक, शिक्षणप्रेमी व शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक बंधुभगिनींचे सहकार्य अमुल्य असे आहे. दोन्ही शाळेला आजपर्यंत पंधरा लाखापर्यंत वस्तुरूपात रोख व श्रमदान करून सहकार्य केले गेले आहे व चालू आहे.
आज शाळा सुसज्ज ग्रंथालय, प्रयोगशाळा, ई -लर्निंग कक्ष, प्रत्येक वर्गात स्मार्ट टी.व्ही.टॅब व ज्ञानरचनावाद साहित्य व मुलभुत सोयींनीयुक्त असुन या साठी गावाचे नागरिकांचा प्राधिकरणाचा शासनाचा व त्यांच्याकडून मिळालेला सहभाग व दोनही शांळाना वस्तुरूपात मिळालेला जवळपास १५ लाखहुन जास्त लोकवाटा व विविध शासनाच्या योजनांचा, शिष्यवृत्तीचा लाभ मिळवुन दिला जातो. या सर्व उपयुक्त बाबींचा ही तडवळा पॅटर्नसाठी मोलाचा वाटा आहे.
हा अभ्यासक्रम घेताना सातवी पर्यंतचे गणित पाठाखाली दिलेला शंब्दसंपत्ती अथवा उपयोजनात्मक मुल्यामापन अवांतर वाचन विद्यार्थी कृती प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो. या पॅटर्नमुळे आज जिल्हाभरातुन प्रवेशासाठी पालकांचा ओढा फार मोठया प्रमाणात वाढल्यामुळे आज प्रवेश नाकरण्याची वेळ येते की काय असे वाटते.
नवोदय बरोबर शिष्यवृत्तीत ही या पॅटर्नचा दबदबा वाढला आहे. सन २०१७-१८ मध्ये १७ तर २०१८-१९ या दोन वर्षातील नवोदयला पात्र विद्यार्थी संख्या २४ आहे.
१९ मध्ये ३१ असे या दोन वर्षात तब्बल ४८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. यामुळे हा नवोदय शिष्यवृत्ती पॅटर्नमुळे दोन्ही शाळेत १७ विद्यार्थी जिल्हाभरातुन प्रवेशीत झालेले आहेत. या पॅटर्नची दखल जिल्हा परिषद पत्रकारबंधूनी मिडीयाद्वारे यशस्वी प्रसिध्दी मिळवून देवून दबदबा निर्माण करण्यास मोठा वाटा आहे.
या तडवळा पॅटर्नचे यशस्वी वाटचालीस या दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी मुख्याध्यापक शाळा ग्रामसमिती व पालक विद्यार्थी यांचे हार्दीक हार्दीक अभिनंदन
तवडवळा पॅटर्नसाठी सर्व स्तरातुन यशस्वी वाटचालीस शुभेंच्छांचा वर्षाव होत आहे. आणि हाच परिसरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकउे पालकांचा ओडा कमी झाला असे मला वाटते. गुणवत्ता हाच शाळेचे ध्येय व प्रगत महाराष्ट्राचे उद्दिष्ट आहे. यामुळे तडवळा गावात १०० टक्के पटनोंदणी, १०० टक्के उपस्थिती व शाळा १०० टक्के शळा प्रगत हेच ध्येय समोर ठेवून येथील सर्व शिक्षक बंधु भगिनी कार्य करताना दिसतात.
पुन्हा एकादा या तडवळा पॅटर्न साठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा
श्री. सय्यद रहिमान मगबुल
मुख्याध्यापक
जि.प.आदर्श कन्या शाळा कसबे तडवळे
ता.जि.उस्मानाबाद मो.नं.९४२१३६०३१८