उस्मानाबाद /प्रतिनिधी - उस्मानाबाद शहरात समर्थ नगर भागात नव्याने सुरु करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ बचत गटाची सभासद नोंदणी सुरु असुन या गटात 100-200 किंवा त्यापेक्षा जास्त सभासदांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या शहरी व ग्रामीण भागातुन सभासद नोंदणीस प्रतिसाद मिळत असुन या बचत गटाचे सभासद होवु इच्छिणाऱ्या उस्मानाबाद जिल्हयातील महिला व पुरुषांनी त्वरीत सभासद व्हावे असे आवाहन अध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे व सचिव आबा सरकाळे यांनी केले आहे.
या बचत गटाची मासिक बचत 1000/-रु. असुन गटाचा अमर्याद कालावधी असणार आहे गटातील सभासदांना दर वर्षी दिवाळीला लाभांष दिला जाणार आहे. तसेच बचत गटातुन कर्ज घेवु इच्छिणाऱ्या सभासदांना 14 टक्के दराने कर्ज वितरीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पुरूषासह महिलाही या बचत गटाच्या सभासद होऊ शकतात. 1 जुलै 2019 पासुन नोंदणी सुरु करण्यात आलेल्या या गटाची सभासद नोंदणी 40 झाली असुन शेतकरी, शेतमजुर,व्यावसायिक, छोटे व्यापारी, गृहिणी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी, सभासद होऊ शकतात. बचत गटाचे कार्यालय द्वारा शिक्षण महर्षी श्री सुभाष(दादा) कोळगे सहकारी पतसंस्था कोर्टाच्या मागे समर्थ नगर ,सरकाळे कॉम्प्लेक्स, येथे असुन अधिक माहितीसाठी मो. 9422466995, 9623496562, फोन नं. 02472-222220 या क्रमांकावर संपर्क करावा. तरी उस्मानाबाद जिल्हयातील नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवुन बचत गटाचे जास्तीत जास्त संख्येने सभासद व्हावे असे आवाहन अध्यक्ष रामदास कोळगे यांनी केले आहे.
