प्रतिनिधी/तुळजापूर -
तालुक्यातील बोरगाव (नळ) व चव्हाणवाडी येथील मातंग समाजाला टार्गेट करून घडवून आणलेल्या घटना या निंदनिय असून मनाला खिन्न करण्याऱ्या आहेत त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण करणे हा गुन्हा आहे तसेच सहन करणे हे ही लज्जास्पद असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील लहुजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यातील सर्व मातंग समाजव्यवस्था विरुद्ध होणाऱ्या घटनांचा निषेधार्थ दि.30 जुलै वार मंगळवार रोजी एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी केले आहे.
मोर्चा या प्रमुख मागण्यासाठी काढण्यात येणार आहे यामध्ये मातंग समाजावरील अन्याय रोखण्यासाठी कायद्यात स्पेशल कोड तरतुद असावी,बोरगाव येथील देडे कुटुंबातील पाडलेली घरांचे शासकीय पुनर्वसन तात्काळ व्हावे,यातील प्रमुख आरोपी विरोधात मोक्का अंतर्गत कार्यवाही व्हावी,व अन्यायग्रस्त कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय नौकरीत सामावून घेऊन 10 लाख रुपयांची मदत द्यावी,चव्हाणवाडी येथील बलात्कार  पीडित मुलीचे व त्या कुटुंबाचे पुनर्वसन करून 10 लाख रुपयांची मदत मिळावी,उस्मानाबाद येथील आण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा नियोजित ठिकाणी उभारण्यात यावा,अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी घोषित करावी,आण्णाभाऊ साठे महामंडळ कडून होणारा कर्ज पुरवठा लवकर सुरू करावा,मातंग समाजाला लोकसंख्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी या मोर्चा आयोजित केला आहे.
लहुजी शक्ती सेना, मातंग समाज, व सर्व लहू सैनिक यांच्या वतीने उस्मानाबाद शहरातील शाहीर आण्णाभाऊ साठे चौका पासून महामोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल तर जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागणीनुसार निवेदन देऊन एल्गार मोर्चाचा समारोप होईल.अन्याय अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा असल्याचे लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी सांगितले व एल्गार महामोर्चात मातंग समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन सभापती शिवाजी गायकवाड , जिल्हा  अध्यक्ष शिवाजी गायकवाड, कोर कमिटी अध्यक्ष बालाजी गायकवाड, संपर्क प्रमुख लक्ष्मण क्षीरसागर, सचिव संतोष मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे, महिला अध्यक्ष सारिकताई कांबळे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष व उस्मानाबाद शहर अध्यक्ष यांनी  असे आवाहन  केले  आहे.
 
Top