लोहारा/प्रतिनिधी-
श्री.स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या कडुन देण्यात येणारा "आदर्श वादक (संगीत)" हा पुरस्कार यंदा मयूर स्वामी यांना देण्यात आले. सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांना हा पुरस्कार देण्यात येतो. पुण्याचे उद्दोजक संदीप फुगे - पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि रोख  अकरा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री.जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, संस्थेचे विश्वस्थ श्री.अमोलराजे भोसले, महेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर, अरविंद शिंदे, आदि उपस्थित होते.  मयूर सध्या डी.ए.व्ही वेलणकर वाणिज्य महाविद्यालय येथे शिकत असून, संगीत शिक्षण संगीतालंकार श्री.एस.एस. कलबुर्गी यांच्या कडे शिकत आहे. अनेक वर्षापासून आपल्या संगीत कलेने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले असून अनेक बक्षिसे व पुरस्कार पटकाविलेले आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ.कीर्ती पांडे, डॉ.सुनील पाटील, डॉ.किशोर थोरे, संतोष वगाले, आकाश चव्हाण, इरेश फताटे, बसवराज स्वामी, सिद्धार्थ भडकुंबे, शरणय्या मसुती, संगमेश्वर निंगदाळे, रेवणसिद्ध हालोळी, शिवशरण इचगे, रोहीत कदम, महेश स्वामी, आदींनी अभिनंदन केले.

 
Top