तेर /प्रतिनिधी - उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असून यश संपादन केलेल्या ११ खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उस्मानाबाद ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटना व श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी तुळजाभवानी स्टेडियम येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच जिल्हास्तरीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत तेर ता. उस्मानाबाद येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील १६ वर्ष वयोगटात प्रणिता जाधवर ( उंच उडी प्रथम ) , प्रतिक्षा पिंपळे ( हल्डस प्रथम ) , माळी अपेक्षा ( १०० मि. धावणे द्वितीय ) राधा गोरे ( भाला फेक प्रथम ) , मते पल्लवी ( भाला फेक द्वितीय ) , कानाडे राजनंदिनी ( २०० मी धावणे प्रथम ) , घोगरे निकीता ( थाळी फेक प्रथम ) , तर १४ वर्षे वयोगटात रोहित ऐकीले ( लांब उडी प्रथम ) , ज्योती आंधळे ( लांब उडी प्रथम ) , सुजाता परगे (गोळा फेक प्रथम ) , रोहित ऐकीले ( गोळा फेक द्वितीय ) भक्ते जयश्री ( ६०० मी. धावणे प्रथम ) , नागलबोने श्वेता ( गोळा फेक तृतीय ) ,
क्रमांक मिळविला. यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी या यशस्वी खेळाडूंचा मुख्याध्यापक नरसिंग जेवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी एम. एन .भंडारे , जे .बी .बोराडे , डी .डी. राऊत , आर .एम. देवकते , एम .एन. शितोळे , ए. एन .रणदिवे , एस. यू .गोडगे , एम .डी .नंरसिगे , एस .एस .बळवंतराव , एस. बी .पाटील , ए .बी .वाघेरे , ए .बी. नितळीकर ,एस .डी .घाडगे , बागवान ,ए .डी .राठोड , एम. एल .कांबळे , खटींग सुर्यकांत , काळे ज्ञानेश्वर , मुळे जे. ए ., पाटील संदीप , सतिश भालेराव ,एस. एस .सामते , दिपाली व्यास , विलास वाघमोडे , ए. बी .सोनटक्के , आर .ए .साखरे , विजयकुमार जाधवर , आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
