उस्मानाबाद/प्रतिनिधी-27 जुलै 2019 रोजी अनंतदास महाराज मठ धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेली विश्व हिंदू परिषदेची जिल्हा व्यापक बैठक उत्साहात संपन्न झाली
या बैठकीच्या सुरुवातीस नुकतेच निधन झालेले विंहिंप देवगिरी प्रांत उपाध्यक्ष घनश्यामजी धनकानी व वाशी येथील विंहिंपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अण्णासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बैठक दोन सत्रात घेण्यात आली. या बैठकीचे प्रास्ताविक बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके यांनी केले. या बैठकीमध्ये जम्मू येथे पार पडलेल्या केंद्रीय बैठक व जळगाव येथे पार पडलेल्या प्रांत बैठकीतील विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच धाराशिव जिल्ह्यात विंहिंप द्वारे चालू असलेल्या सेवा प्रकल्पांची माहिती देण्यात आली. मागील सहा महिन्यात झालेल्या कामाचा आढावा घेऊन आगामी काळात करावयाच्या कार्याची माहिती देण्यात आली. तसेच विंहिंप हितचिंतक सदस्यता नोंदणी अभियानाचीही माहिती सदस्यांना देण्यात आली.
बैठकीच्या दुसऱ्या सत्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड मिलिंद पाटील यांनी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत विजय संपादन केल्याबद्दल त्यांचा विंहिंप धाराशिव च्या वतीने सत्कार करण्यात आला. यानंतर संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये हभप गोपीनाथ महाराज बानगुडे यांची परंडा प्रखंड अध्यक्षपदी, प्रा. काकासाहेब शिंदे सर यांची तुळजापूर प्रखंड अध्यक्षपदी, सौ प्रभावती मार्डीकर यांची मातृशक्ती जिल्हा संयोजिका पदी, सौ महानंदा पैलवान यांची सह मातृशक्ती संयोजिका पदी, अविनाश अभंगराव यांची उमरगा प्रखंड संयोजक पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस विंहिंप जिल्हामंत्री श्रीकृष्ण धर्माधिकारी, बजरंग दल जिल्हा संयोजक अॅड विक्रम साळुंके, विंहिंप जिल्हाध्यक्ष श्री दत्तात्रय चवरे, लातूर विभाग संघटनमंत्री श्री संतोष कुलकर्णी, जिल्हा पालक हभप बाबुराव महाराज पुजारी, विंहिंप जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्ता माकोडे, सहमंत्री परमेश्वर शिंदे, कोषप्रमुख श्री जयंत महाजन, जिल्हा गोरक्षा प्रमुख हभप आकाश महाराज मगर, हभप रामचंद्र बचाटे महाराज, ग्रामीण प्रखंड अध्यक्ष हभप महादेव महाराज साळुंके, हभप बब्रूवान सुरवसे महाराज, हभप दामोदर बनसोडे महाराज, हभप बालाजी कतपुरे महाराज, ग्रामीण प्रखंड संयोजक संजय माळी यांच्यासह जिल्ह्याभरातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.