उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद/लातूर/ बीड या तीन जिल्हयातील राष्ट्रीय बालहक्क संरक्षण संदर्भात दि.७ व ८ ऑगस्ट रोजी केंद्रीय सदस्य व महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रविण घुगे चर्चा करणार असून ९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय बालहक्क व संरक्षण आयोगाची जनसुनवाई होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिपा मुधोल-मुंडे यांनी पत्रकार परिषदे मध्ये सांगितली.
३१ जुलाईच्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदे मध्ये जिल्हाधिकारी मुधोल मुंडे यांनी बालकामगार, मोबदला न मिळणे, भिक मागणारी मुले, जबदरस्ती ने भिक मागणारी मुले, दुर्लक्षीत मुले, पालकांचा छळ करणारी संस्था, शाळेच्या फी संदर्भातील तक्रार, शाळेच्या सुविधा अभावी गैरहजर राहिलेली मुले, शाळेत प्रवेश नाकारलेली मुली, शाळेतुन पुस्तके मिळण्यापासुन वंचित असलेली मुले, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे पिढीत मुले आदी बाबत १८ वर्षांच्या आतील बालकांवर होत असलेल्या अत्याचार संदर्भात दि.९ ऑगस्ट रोजी उस्मानाबाद येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी १० वाजल्यापासुन जनसुनवाई होणार आहे. उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्यातील बालकांच्या तक्रारी बाबत यात सुनावणी होईल. विशेष म्हणजे जनसुनवाई दरम्यान तीनही जिल्हयाचे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित राहुन सुनावणीनंतर लगेच निकाल देण्यात येणार आहेत. या जनसुवणी मध्ये तक्रारदार बालकांनी मोठया प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकरी दिपा मुधोल-मुंडे यांनी केले आहे. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अशोक सावंत उपस्थित होते.