उस्मानाबाद/प्रतिनिधी-
नागरिकांनी जलपुनर्भरणाचा प्रयोग (रेन वॉट हार्वेस्टिंग) केल्यास त्यांना चालू वर्षीच्या मालमत्ता करात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. पालिकेचा हा निर्णय दुष्काळाच्या वाढत्या झळा पाहता महत्वपूर्ण ठरणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पालिकेने दिली नसली तरी नगराध्यक्षांनी मात्र त्यांच्या फेसबुक वॉलवर ही घोषणा केली आहे.
उस्मानाबाद शहरासह जिल्हयावर यंदाही पावसाची अवकृपा असल्याचे आत्तापर्यंत तरी सिध्द झाले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण दुष्काळाचा सामना केलेल्या उस्माबादकरांच्या तोंडचे यामुळेच पाणी पळाले आहे. दरम्यान पालिकेने यापूर्वी मालमत्ता करात सवलत देऊन जलपुर्नभरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले होते. दरम्यान नागरिकांनी याला म्हणवा तसा प्रतिसाद दिला नव्हता. यंदाही
पाण्याचे भीषण संकट पाहता नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी पुढाकर घेत यंदा हा प्रयोग करणा-या नागरिकांना मालमत्ता करात ५० टकके सवलत देण्याची घोषणा केली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी यात सभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागरिकांनी जलपुनर्भरणाचा प्रयोग (रेन वॉट हार्वेस्टिंग) केल्यास त्यांना चालू वर्षीच्या मालमत्ता करात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. पालिकेचा हा निर्णय दुष्काळाच्या वाढत्या झळा पाहता महत्वपूर्ण ठरणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पालिकेने दिली नसली तरी नगराध्यक्षांनी मात्र त्यांच्या फेसबुक वॉलवर ही घोषणा केली आहे.उस्मानाबाद शहरासह जिल्हयावर यंदाही पावसाची अवकृपा असल्याचे आत्तापर्यंत तरी सिध्द झाले आहे. गेल्या वर्षी कमी पावसामुळे भीषण दुष्काळाचा सामना केलेल्या उस्माबादकरांच्या तोंडचे यामुळेच पाणी पळाले आहे. दरम्यान पालिकेने यापूर्वी मालमत्ता करात सवलत देऊन जलपुर्नभरण करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन दिले होते. दरम्यान नागरिकांनी याला म्हणवा तसा प्रतिसाद दिला नव्हता. यंदाही
पाण्याचे भीषण संकट पाहता नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकरांनी पुढाकर घेत यंदा हा प्रयोग करणा-या नागरिकांना मालमत्ता करात ५० टकके सवलत देण्याची घोषणा केली आहे. शहरातील सर्व नागरिकांनी यात सभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.