उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राहिलेले डाॅ. प्रवीण गेडाम यांची केंद्राच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी आणि धोरण निश्चितीची महत्त्वाची जबाबदारी डाॅ. गेडाम यांच्यावर यामाध्यमातून राहणार आहे. तया प्राधीकरणाचे कार्यालय नवी दिल्ली येथे आहे. सध्या डॉ. गेडाम हे रेल्वेमंत्र्यांचे सेक्रेटरी म्हणून कार्यरत होते. या नवीन नियुक्तीने डॉ. गेडाम यांना पुन्हा वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्यास मिळणार आहे. 
 
Top