उस्मानाबाद/प्रतिनिधी-बचत गटाच्या नाविन्यपूर्ण व्यवसायीक संकल्पनांना प्रोत्साहीत करण्यासाठी, बचत गटांना व्यवसायीक पायाभूत सुविधा निर्माण करून त्यांना अर्थ सहायय करण्याच्या हेतूने सुरू केलेल्या शासनाच्या हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची योजनेच्या माहिती सत्राचे आयोजन   दिनांक 26.07.2019 रोजी पंचायत समिती सभागृह लोहारा येथे आयोजन करण्यात आले होते.या माहिती सत्रसाठी जिल्हा स्तरावरून DIC MITCON चे मा.चव्हाण हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मा.तहसीलदार विजय अवधने व गटविकास अधिकारी अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या माहिती सत्र कार्यक्रमास महिलांना नाविन्यपूर्ण कल्पना व आजची व्यवसायिक बाजारपेठ याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी लोहारा शहरातींल नामांकित , अनुभवी व्यवसायीक , एनजन्सीधारक श्री. स्वामी यांना निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी हिरकणी योजना बाबत व स्पर्धेविषयी सविस्तर  माहिती देऊन योजनेची कार्यपद्धती प्रस्ताविकातून विशद केली. या  कार्यक्रमास बालविकास प्रकल्प अधिकारी जमादार मॅडम तालुका अग्रणी बँक प्रतिनिधी सिन्हा , विस्तार अधिकारी पंचायत ढाकणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड , अमोल कासार व हनुमंत कार्बलवड यांनी केले. माहिती सत्र कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रभाग समन्वय सौरभ जगताप यांनी केले.या कार्यक्रमास सर्व प्रभाग समनव्यक प्रभाग कृषी व पशुधन व्यवस्थापक तालुक्यातील सर्व समुदाय संसाधन महिला व गटाच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Top