तुळजापुर / प्रतिनिधी -
रूपामता अर्बन व मल्टीस्टेटच्या माध्यमातून गरजू महिला बचत गटांना कर्ज देण्यात येत आहे. आतापर्यंत महिलांनी कर्ज घेवून १०० टक्के त्याची परतफेड केली आहे. रूपामाताशी २५० महिला बचत गट जोडले गेले आहेत. आणखीन महिला गटांना जोडण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी रूपामाता उद्योग समूह सदैव तयार असून यापुढेही महिलांना उद्योगधंद्यासाठी रूपामाता बँक कर्ज पुरवठा करणार असल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन ॲड. व्यंकट गुंड यांनी केले.
शहरातील पुजारी मंडळाच्या मंगल कार्यालय सभागृहात रविवारी (दि.२८) रूपामाता उद्योग समूहातर्फे घेण्यात आलेल्या मेळाव्यात हजारो महिलांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना चेअरमन ॲडग़ुंड बोलत होते. प्रारंभी रूपामाता यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून मेळाव्यास सुरूवात करण्यात आली.  मेळाव्यास उद्घाटक म्हणून महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ॲड. व्यंकट गुंड तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृतीसंघ अधिकारी गोरक्षणात भांगे, जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी, उद्योजकता विकास, सोलापूरचे प्रवक्ते नागेश कोकरे, अर्थसिध्दी सर्व्हिसचे एम.डी. राजेश बडख, विभागीय व्यवस्थापक लक्ष्मी चांदणे, शाखा व्यवस्थापक मिरा मुंडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, माजी जिप उपाध्यक्ष सुधाकर गुंड, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा क्रांती िथटे, भाजपा सरचिटणीस गुलचंद व्यवहारे, प्रभाकर मुळे, जिप सदस्य ज्ञानदेव राजगुरू, भाजप महिला जिल्हाउपाध्यक्षा मीना सोमाजी, तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, युवती मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे, महानंदा पैलवान यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ॲड. गुंड म्हणाले, पैशाची बचत करण्याची कला केवळ महिलांकडेच आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महिला बचत गट असून ते सक्षमपणे चालविण्यात येत आहेत. रूपामाता बँकेच्या माध्यमातून अशा बचत गटातील महिलांना उद्योगधंदे उभारणीसाठी तात्काळ कर्जपुरवठा करण्यात येत आहे. २५० महिला बचत गटांना रूपामाताशी जोडण्यात आले असून आणखीन जवळपास ३ हजार महिला गटांना जोडण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच रूपामाता दुग्ध प्रकल्पाचे ३५० ठिकाणी सेंटर आहेत. मात्र हे सेंटर पुरूष चालवित आहेत. तसेच इतर नवीन सेंटर महिलांना चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत. महिलांना कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, पापड तयार करणे आदीसह विविध उद्योगधंदे व व्यवसायासाठी रूपामाताकडून भांगभांडवल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी रूपामाता सदैव महिलांसोबत खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला बचत गटांनी रूपामाता बँकेत खाते काढून व्यवहार करावा.  त्यांना आम्ही कर्जपुरवठा करू, असे आवाहनही ॲडग़ुंड  यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी रूपामाता डेअरीचे सरव्यवस्थापक सुर्यकांत गरड, व्हाईस चेअरमन मनोहर सुर्यवंशी, रूपामाता संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ जोशी, सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले, विभागीय व्यवस्थाक मिलिंद खांडेकर, ॲड. विद्युलता दलभंजन, ॲड. वैशाली देशमुख आदींसह रूपामाता उद्योगसमूहाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
Top