लोहारा/प्रतिनिधी-
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व  प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यात समतादूत वृक्षारोपण सप्ताह राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणाचे महत्व जनमानसापासून सरकारी अधिकाऱ्यापर्यंत पोहचावे हा उद्देश समोर ठेऊन बार्टीचे महासंचालक मा. कैलास कणसे (भा.प्र.से) यांच्या संकल्पनेतुन व मुख्य प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात समतादूतांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक जनजागृती करून वृक्षारोपण  करण्यात येत आहे.  याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हयातील लोहारा व उमरगा तालुक्यातील समतादूत नागनाथ फुलसुंदर व किरण चिंचोले यांनी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वृक्षारोपण केले. हे वृक्षारोपण तालुका पोलीस ठाणे, सरकारी आरोग्य केंद्र, माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत, मुस्लिम दफनभूमी, स्मशानभूमी येथे वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पो. नि. ए. ए.चौरे, पो.हे.कॉ. ए.आर. गिरी, पो. हे. कॉ. एल. एम. घादगिणे, पो. हे. कॉ. डि. जी. पठाण, पो.ना. एस. के. हालसे, पो. कॉ. व्ही. एन. देशमुख, समतादूत नागनाथ फुलसुंदर, किरण चिंचोले, निसर्गप्रेमी दत्ता माळी, ज्ञानेश्वर पवार, जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक रखमाजी जाधव, सुभाष आतकरे, बळीराम भुसकांडे, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top