परंडा/प्रतिनिधी - जिल्हा परिषद कन्या हायस्कूलचे हिंदी विषयाचे प्रसिद्ध सेवानिवृत्त शिक्षक मधुकर भाऊराव सोनटक्के (७५) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी निधन झाले. त्यांनी १९६९ पासून २००१ पर्यंत सुमारे ३२ वर्षे कन्या प्रशालेत अध्यापनाचे कार्य केले. हिंदी, इतिहास, नागरिकशास्त्र आदी विषयांचे अध्यापन केले व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात होते.
 परंडा तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था येथे १९७९-८३ व १९८६-८८ या वर्षात दोनवेळा चेअरमन पदी विराजमान होऊन पतसंस्थेच्या व्यवहारात पारदर्शक व काटकसर करून पतसंस्था समर्थपणे चालवून त्यांच्याच काळात शिक्षक हौसिंग सोसायटी उभारली. शिक्षकांचे आधारवड म्हणून ओळखले जायचे.त्यांनी सामाजिक व शैक्षणिक चळवळीत परंडा तालुक्यात मोठे योगदान दिले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांमध्ये आठवणी दाटून आल्या. त्यांच्यावर दि.२५ गुरूवारी रोजी सकाळी कुर्डुवाडी रोडवरील बौध्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी,३ मुले,३ मुली तसेच सूना, नातवंडे असा परिवार आहे. लोकमत नांदेडचे उपसंपादक विशाल सोनटक्के यांचे वडील होत.
 
Top